Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine’s Day 2026: व्हॅलेंटाइन डेला गर्लफ्रेंडला द्यायचंय खास गिफ्ट पण बजेट कमी आहे? ‘या’ ५ जबरदस्त आयडियाज नक्की ट्राय करा!

व्हॅलेंटाइन डेसाठी गर्लफ्रेंडला देण्यासाठी बजेटमध्ये बसणारे सर्वोत्तम गिफ्ट शोधत आहात? कमी किमतीत जोडीदाराचे मन जिंकणाऱ्या ५ जबरदस्त गिफ्ट आयडियाजसाठी हा लेख नक्की वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 05, 2026 | 07:07 PM
व्हॅलेंटाइन डेला गर्लफ्रेंडला द्यायचंय खास गिफ्ट पण बजेट कमी आहे? (Photo Credit- X)

व्हॅलेंटाइन डेला गर्लफ्रेंडला द्यायचंय खास गिफ्ट पण बजेट कमी आहे? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • व्हॅलेंटाइन डेला गर्लफ्रेंडला द्यायचंय खास गिफ्ट पण बजेट कमी आहे?
  • ‘या’ ५ जबरदस्त आयडियाज नक्की ट्राय करा!
Valentine’s Day 2026: फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना! आपल्या मनातील भावना जोडीदारासमोर व्यक्त करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. अनेकजण रोझ डेपासून व्हॅलेंटाइन डेपर्यंत आपल्या पार्टनरला विविध भेटवस्तू देऊन खूश करण्याचा प्रयत्न करतात. पण, प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी महागड्या भेटवस्तूंचीच गरज असते असे नाही. जर तुमचे बजेट कमी असेल, तर तुम्ही फक्त १००० रुपयांच्या आतही अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण गिफ्ट्स देऊ शकता. तुमच्या खिशाला परवडतील आणि पार्टनरला नक्कीच आवडतील अशा ५ बजेट-फ्रेंडली गिफ्ट आयडियाज खालीलप्रमाणे आहेत:

१. पर्सनलाइज्ड फोटो फ्रेम (Personalized Photo Frame)

तुमच्या प्रेमाचे क्षण एका फ्रेममध्ये कैद करून देणे हा एक अतिशय भावनिक पर्याय आहे. तुमच्या आवडीचा फोटो आणि एखादा छोटासा मेसेज असलेली फ्रेम पार्टनरला खूप खास वाटते.

  • किंमत: साधारण ५०० ते ८०० रुपयांच्या दरम्यान.

२. चॉकलेट गिफ्ट हॅम्पर (Chocolate Gift Hamper)

तुमच्या जोडीदाराला गोड खाण्याची आवड असेल, तर चॉकलेट हॅम्पर हा ‘बेस्ट’ पर्याय आहे. विविध ब्रँडेड चॉकलेट्सचा एक छोटा बॉक्स किंवा आकर्षक पॅकिंगमधील हॅम्पर तुम्ही घेऊ शकता. सोबत एक छोटेसे लव्ह लेटर लिहून हा आनंद द्विगुणित करा.

  • किंमत: ५०० रुपयांपासून पुढे उपलब्ध.

३. कपल मग किंवा कपल की-चेन (Couple Mugs or Keychains)

कपल मग किंवा की-चेन हे दिसायला अतिशय क्युट आणि डेली युजसाठी उपयुक्त असतात. बॅग किंवा कारच्या चावीला लावण्यासाठी कपल की-चेन हा एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे.

  • किंमत: साधारण ३०० ते ७०० रुपयांपर्यंत.

Valentine’s Day 2026: तुमच्या आवडत्या व्यक्तिला द्या खास सरप्राईज! गिफ्ट करा हे बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, किंमत 30 हजारांहून कमी

४. परफ्यूम (Perfume)

व्हॅलेंटाइन डेसाठी परफ्यूम हे एक क्लासिक गिफ्ट मानले जाते. तुमच्या पार्टनरला कोणता सुगंध आवडतो, हे लक्षात घेऊन तुम्ही एक चांगला परफ्यूम ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. चांगल्या ब्रँड्सचे मिनी परफ्यूम्स बजेटमध्ये सहज उपलब्ध होतात.

  • किंमत: ५०० ते १००० रुपयांच्या दरम्यान अनेक चांगले पर्याय मिळतील.

५. हाताने लिहिलेले पत्र किंवा DIY स्क्रॅपबुक (Handwritten Letter or Scrapbook)

जर तुम्हाला तुमचे प्रेम मनापासून व्यक्त करायचे असेल, तर तुमच्या हाताने लिहिलेले पत्र (Handwritten Letter) किंवा स्वतः बनवलेले छोटे स्क्रॅपबुक सर्वात मौल्यवान ठरेल. यामध्ये पैशांपेक्षा तुमचे कष्ट आणि वेळ दिसून येतो, जो पार्टनरसाठी अमूल्य असतो.

  • किंमत: अगदी १०० ते २०० रुपयांच्या साहित्यात तयार होईल.

Valentine’s Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स…. जाणून घ्या सविस्तर

Web Title: Want to give your girlfriend a special gift on valentines day but have a limited budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Valentines Day

संबंधित बातम्या

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
1

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
3

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
4

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.