मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी वेलची
जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शिवाय मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. मधुमेह झाल्यानंतर अनेक पथ्य पाळावी लागतात. पथ्य न पाळल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण आणखीन जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात जास्त गोड किंवा साखरयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. मधुमेह झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचारासोबतच घरगुती उपाय सुद्धा करावे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर किंवा मधुमेह होऊ नये, म्हणून वेलचीच्या पाण्याचे सेवन कसे करावे? वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वेलचीच्या पाण्याचे नियमित किंवा आठवड्यातून तीनदा सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. शिवाय शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढून रु रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेह झाल्यानंतर नियमित वेलचीचा चहा किंवा वेलचीचे पाणी प्यावे. वेलचीमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.
अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. अशावेळी मसाले चहा बनवण्याऐवजी वेलची घालून चहा बनवावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. वेलचीचा चहा प्याल्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होते, पचन क्रिया सुधारते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळीस वेलचीच्या चहाचे सेवन करू शकता.
मधुमेह झाल्यानंतर वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. वेलचीचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात २ वेलची बारीक कुस्करून टाका. दोन तास ठेवल्यानंतर वेलचीच्या पाण्याचे सेवन करा. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. वेलचीचे पाणी प्याल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील इतर अवयवांचे कार्य सुधारते.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. शिवाय या पाण्याच्या सेवनामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तवाहिन्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी वेलचीच्या पाण्याचे सेवन करावे. वेलचीतील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत करतात.