अन्न अंगाला तेव्हाच लागतं जेव्हा त्याचे योग्य पचन होते. त्यामुळे शरीराची पचन क्रिया फार महत्वाची असते. शरीराचे पचन योग्य नसेल तर अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. यामध्ये पोटासंबंधित असणारे आजारपण प्रमुख असतात. त्यामुळे आपण काय सेवन करत आहोत? या गोष्टींवर लक्ष देणे फार महत्वाचे असते. चला तर मग जाणून घेऊयात 'या' खाद्य पदार्थांबद्दल:
पचनासाठी उत्तम खाद्यपदार्थ कोणते? जाणून घ्या ( फोटो सौजन्य - Social Media )
सफेद तांदळापेक्षा ब्राउन राईज आरोग्यसाठी फायद्याचे असते. त्यात फायबरचे प्रमाणही अधिक असते आणि पोषक तत्वेही अफाट असते. मुळात, याचे सेवन केल्याने पचन सुधारते.
हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करत चला. पालक, कोथिंबीर, मेथी यामध्ये फायबर भरपूर असतो. यामुळे पचन सुधारते आणि आरोग्य चांगले राहते.
प्रथिने पचनासाठी चांगले जर ते लीन असतील. चिकन, मासे, डाळी या सडपातळ प्रथिनांचे सेवन पचनासाठी चांगले आहे.
कमी फ्रक्टोज असलेली फळे खात चला. केळी, पपई आणि संत्री यांसारखी फळे पचनासाठी उपयुक्त आहेत.
अवोकाडो खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. अवोकाडोमध्ये फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात, जे पचनासाठी फायदेशीर ठरतात.