सुंठाच्या पाण्याचे शरीराला फायदे
आयुर्वेदामध्ये आल्याल अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण अनेक फायद्यांनी परिपूर्ण औषध मानले जाते आणि त्याचा अनेक आजारांवरही वापर करता येतो. विशेषत: वाळलेले आले, ज्याला मराठीत सुंठ असेही नाव आहे, त्याचे अगणित फायदे आहेत. सुंठ तुमच्या दिवसाची सुरुवात निरोगी आणि उत्साही करू शकते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी सुंठाचे पाणी पिण्याची सवय केवळ आपले आरोग्य सुधारू शकत नाही तर अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास देखील उपयुक्त आहे.
सुंठाचा उपयोग आयुर्वेदात अनेक शतकांपासून औषधी गुणधर्मांसाठी केला जात आहे. वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत सुंठाचे पाणी तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा सर्वात सोपा आणि प्रभावी भाग बनू शकते. चला तर मग जाणून घेऊया रोज सकाळी सुंठाचे पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर का आहे याबाबत WebMD ने अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
पचनशक्ती सुधारण्यासाठी
पचनशक्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी करा वापर
सुक्या आल्याचे अर्थात सुंठाचे पाणी पोटाशी संबंधित समस्यांवर रामबाण उपाय मानले जाते. यामध्ये असलेले नैसर्गिक एन्झाइम्स पचन सुधारतात आणि ॲसिडिटी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यात मदत करतात. सुंठाचा स्वतःचा असा एक वेगळा स्वाद असतो आणि त्याचे गुणधर्म पोटाशी संबंधित त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात
रोज सकाळी आल्याचा तुकडा चघळल्याने शरीराला होतात बरेच फायदे, वाचा डॉक्टरांचा सल्ला
वजन कमी करण्यासाठी
सुंठाच्या पाण्याने करा वजन कमी
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सुंठाचे पाणी तुम्हाला मदत करू शकते. हे शरीरातील चयापचय गतिमान करते आणि अनावश्यक चरबी जाळण्यास मदत करते. मात्र यासह तुम्ही नियमित व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे. तुमच्या शरीरातील चरबी त्वरीत जाळण्यासाठी तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी सुंठाचे पाणी पिणे उत्तम ठरू शकते
प्रतिकारशक्ती वाढते
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करा उपयोग
सुंठामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी आणि इतर हंगामी आजारांपासून बचाव करण्यासाठी ते प्रभावी आहे. सध्या थंडीच्या दिवसामध्ये याची अधिक गरज भासते. सर्दी-खोकला आणि तापासारखे आजार दूर ठेवण्यासाठी तुम्ही नियमित सुंठेच्या पाण्याचे सेवन करावे
सूज आणि सांधेदुखीसाठी
शरीराला आलेली सूज वा सांधे दुखत असल्यास उपयुक्त
सुंठेचे पाणी शरीरातील सूज कमी करते आणि सांधेदुखीपासून आराम देण्यास मदत करते. संधिवात आणि तीव्र वेदनांनी ग्रस्त लोकांसाठी हा एक प्रभावी उपाय आहे. रोज सकाळी उठून उपाशीपोटी तुम्ही सुंठेचे पाणी प्यावे. रात्री सुंठ पाण्यात भिजत घाला आणि सकाळी हे पाणी उकळून प्या. लवकरच तुम्हाला योग्य परिणाम दिसून येईल
रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिण्याचे ५ फायदे, जाणून घ्या सविस्तर
मधुमेही रूग्णांसाठी
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी प्यावे सुंठाचे पाणी
मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुंठेचे पाणी खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते आणि शरीर आतून निरोगी ठेवते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने रोज सकाळी तुम्ही सुंठेचे पाणी नक्की पिऊ शकता. यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. रोज 1 ग्लास सुंठेचे पाणी प्यावे
चमकदार त्वचा
त्वचेवरील चमक राखण्यासाठी
सकाळी सकाळी उपाशीपोटी सुंठेचे पाणी प्यायल्याने शरीरातील घाण निघून जाते. विषारी पदार्थांचा शरीरातून लवकर निचरा होतो आणइ याशिवाय सुंठेचे हे पाणी रक्त परिसंचरण अर्थात रक्ताचा प्रवाह सुधारते, ज्यामुळे त्वचा सुधारते आणि अधिक चमकदार दिसते. तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी याचा चांगला उपयोग करून घेता येतो
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.