कच्च्या हळदीचे फायदे
जेवणाची चव वाढवण्यासाठी जसा मीठाचा वापर केला जातो तसाच वापर हळदीचा सुद्धा केला जातो. जेवणाची चव आणि रंग वाढवण्यासाठी हळद फायदेशीर आहे.हळदीमध्ये अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात. जेवणातील पदार्थांमध्ये हळद टाकली नाही तर जेवणात काहीतरी नसल्यासारखे वाटते.जेवणात किंवा इतर ठिकाणी कच्च्या हळदीचा वापर न करता हळदी पावडर वापरली जाते. भारतीय स्वयंपाक घरात हळद हा मसाल्यातील पदार्थ असतोच.
हळदीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो, तसाच वापर औषधासाठी देखील केला जातो. पायाला सूज आल्यानंतर किंवा जखम झाल्यानंतर सगळ्यात आधी हळद लावण्याचा सल्ला दिला जातो. जखमेवर हळद लावल्यानंतर जखम लवकर बरी होते. मागील अनेक शतकांपासून हळदीचा वापर केला जात आहे. आयुर्वेदामध्ये हळदीला विशेष महत्व आहे. हळदीच्या पावडर सोबतच कच्च्या हळदीचा देखील आहारात समावेश केल्यास आरोग्याला फायदे होतील. कच्ची हळद हळदीच्या पावडरपेक्षा अधिक प्रभावी आहे. चला तर जाणून घेऊया कच्च्या हळदीचे फायदे.(फोटो सौजन्य-istock)
कच्च्या हळदीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. कच्ची हळद सुंगंधी आणि चवीला अधिक सुंदर असते. यामुळे जेवणाची चव वाढण्यास मदत होते. अजूनही अनेक स्वयंपाक घरांमध्ये कच्च्या हळदीचा वापर केला जातो. कच्च्या हळदीला पावडरच्या हळदीपेक्षा अधिक सुगंध असतो.

कच्च्या हळदीचे फायदे
कच्च्या हळदीमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचेचा रंग उजळ्वण्यासाठी गुणकारी ठरतो. हळदी पावडर तयार करताना हळदीमधील आवश्यक गुणधर्म निघून जातात. कच्च्या हळदीला असलेला वास हळदी पावडरला येत नाही. कच्ची हळद वाळवल्यामुळे आणि दळल्यामुळे त्यातील टिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स नष्ट होऊन जातात.
कच्च्या हळदीमध्ये असलेले तेल हळद दळण्याच्या प्रक्रियेमुळे नष्ट होऊन जाते. हळदीमध्ये अटलांटोन असते, जे औषधांसाठी प्रभावी आहे. कच्च्या हळदीपासून पावडर तयार करताना त्यातील आवश्यक सर्व घटक, हळदीची चव, सुंगंध, रंग निघून जातो.

कच्च्या हळदीचे फायदे
कच्ची हळद अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे हळदीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि आवश्यक तेलांसह अनेक पोषक घटक आढळून येतात. जे शरीर, त्वचा, केसांसाठी गुणकारी आहे. कच्च्या हळदीवर प्रक्रिया केल्यानंतर त्यातील संयुगे बदलून जातात.






