फोटो सौजन्य - Social Media
तन्वी आणि प्रभू, बिग बॉसच्या घरात अगदी सख्या बहीण भावाप्रमाणे राहत होते. पण प्रभूच्या घराबाहेर जाण्याने दोघांमध्ये अंतर झाले आहे. प्रभू बिग बॉसच्या घरामध्ये असताना त्याने अनेकदा म्हंटले आहे की त्याच्या घरी TV नाही आहे. त्यामुळे तन्वीच्या कुटुंबीयांनी प्रभूच्या कुटुंबाला एक Tv गिफ्ट केला आहे आणि तन्वीने प्रभूला दिलेला शब्द पाळला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तन्वी अद्याप बिग बॉसच्या घरामध्येच आहे. तरीही तिने आणि तिच्या कुटुंबाने आवर्जून शेळके कुटुंबियांना घरी बोलावून, त्यांचा आदर सन्मान करून TV भेट दिली आहे.
तन्वीच्या कुटुंबासमवेत तिच्या मित्रांनीही या आनंद वाटण्यात भाग घेतला आहे. या संबंधित Video सध्या Social माध्यमांवर प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या प्रेक्षकांकडून तन्वीचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच प्रभूचे आणि संपूर्ण शेळके परिवाराचे अभिनंदन केले जात आहेत. पोस्टमध्ये प्रभूचे संपूर्ण कुटुंब आणि तन्वीची आजी आणि मित्र दिसून येत आहेत. यावेळी प्रभूने तन्वीचे आभार मानले आहेत आणि त्यांच्या नात्याबद्दलचे प्रेम त्याने व्यक्त केले आहे. तसेच बिग बॉसच्या प्रेक्षकांना तन्वीला भरपूर ओट करण्याचे आवाहन केले आहे आणि तन्वीसाठी प्रेम आणि पाठिंबा दर्शवला आहे.






