SRH vs KKR Live Streaming (फोटो- ट्विटर)
केकेआरने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
ईडन गार्डन्सवर सुरू आहे आयपीएलचा सामना
ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने दिली चांगली सुरुवात
Tata IPL 2026 SRH vs KKR Live: आज कोलकताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादच्या (SRH vs KKR) सामना सुरू आहे. आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. 7.30 वाजता सामना सुरू झाला. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याचे ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने दाखवून दिले. सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाइट रायडर्सला धावांचे लक्ष्य दिले आहे.
सनरायजर्स हैदराबादकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा हे सलामीवरम्हणून खेळण्यासाठी आले. त्यांनी एसआरएच संघाला चांगली सुरुवात करून दिली. पॉवर प्लेमध्ये ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी 82 धावा जोडल्या. ट्रेविस हेड 46 धावा करून बाद झाला.तर अभिषेक शर्मा 21 चेंडूत 48 धावा करून बाद झाला.
सलामी जोडीने हैदराबादच्या संघाला वादळी सुरुवात करून दिली. सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशन 14 धावा करून बाद झाला. तर अनिकेत वर्मा केवळ 1 च धाव करू शकला. नितीश कुमार रेड्डीने संघाला 200 पार पोहोचवले. तो 38 धावा करून वैभव अरोराच्या गोलंदाजीचा शिकार ठरला आहे. तर साहिल आरोरा शून्यावर आउट झाला. शिवांग कुमार 4 धावा करून बाद झाला.
KKR vs SRH Live Toss: केकेआरला ‘अजिंक्य’ ठेवण्यासाठी रहाणेचा ‘हा’ निर्णय; SRH च्या अडचणी वाढणार
वैभव अरोरा याने 47 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. ब्लेसिंग मुझाराबानीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सुनील नारायणला एकही विकेट घेता आली नाही. कार्तिक त्यागी आणि अनुकूल रॉयने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
Klaas Apart! 😍 🎥 Heinrich Klaasen at his innovative best 🤌 Scorecard ▶️ https://t.co/iCMFpDudP7#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvSRH | @sunrisers pic.twitter.com/zr9UIYSQYO — IndianPremierLeague (@IPL) April 2, 2026
पीच रिपोर्ट ठरला खरा
ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग समजली जाते. लाइट्स असताना या ठिकाणी फलंदाजी करणे खेळाडूना आवडते. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. अंतर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी जोरदार खेळी केली. शेवटी नितीश कुमार रेड्डी, हेनरी क्लासेनच्या अर्धशतकीय खेळीने सनरायजर्स हैदराबादचा संघ 226 धावांपर्यंत मजल मारू शकला.
केकेआरची संभाव्य टीम: फिन्न ॲलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, रॉवमन पॉवेल,
एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, अनिकेत वर्मा, सलील अरोरा






