घरच्या घरी करा 'हे' व्यायाम प्रकार
सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम केल्याने आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात. धावपळीच्या जीवनात अनेकदा आपल्याला व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. अश्यावेळी तुम्ही घरातील काही कामे करून व्यायाम करू शकता. सतत बदलत चालेले वातावरण, जीवनशैलीमध्ये होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप इत्यादी गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे अनेकदा मधुमेहासारख्या गंभीर आजार होण्याची शक्यता असते. मधुमेह हा कधीही न बरा होणारा आजार आहे. मधुमेह झाल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात.
मधुमेहासारख्या गंभीर आजार झाल्यानंतर अनेक पथ्य पाळावी लागतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरातील इतर अवयवांना इजा होण्याची शक्यता असते. मधुमेह झालेल्या रुग्णांना जखम झाल्यानंतर ती लवकर बरी होत नाही. तसेच मधुमेह झाल्यानंतर कायम स्वरूपी गोळ्या औषध घ्यावी लागतात. त्यामुळे योग्य ती जीवनशैली जगून आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. मधुमेह झाल्यानंतर तो नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण काही केल्या मधुमेह कमी होत नसेल तर हे व्यायाम नक्की करा. घरच्या घरी व्यायाम केल्याने मधुमेह नियंत्रणात येतो.(फोटो सौजन्य-istock)
मधुमेह असलेल्या रुग्णांनी आठवड्यातून तीन वेळा २५ मिनिटं डान्स केला पाहिजे. डान्स केल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील मानसिक ताणतणाव कमी होऊन मन आंनदी राहते. डान्स केल्यामुळे कॅलरीज बर्न होतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी डान्स करणं हा एक उत्तम पर्याय आहे.
हे देखील वाचा: शरीरात जाणवते लोहाची कमतरता? तर आहारात करा ‘या’ गुणकारी पदार्थांचे करा सेवन
घराच्या अंगणात असलेल्या बागेत झाडांना पाणी देणे, झाडांची काळजी घेणे, त्यांच्या मुळांना माती घालणे इत्यादी कामे केल्याने मन आनंदी राहते. तसेच मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. बागेतील काम केल्यामुळे शरीराची सतत कसरत होते. शरीराची हालचाल झाल्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ पचण्यास मदत होते.
घरच्या घरी करा ‘हे’ व्यायाम प्रकार
योग आणि प्राणायाम केल्यामुळे लठ्ठपणा, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहून आरोग्य सुधारते. मानसिक ताणतणावापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित योग किंवा प्राणायाम करावे. यामुळे मनाला शांती मिळते.
हे देखील वाचा: ‘या’ रुग्णांनी चुकूनही करू नका मधाचे सेवन, अन्यथा आरोग्यावर दिसून येतील गंभीर परिणाम
पायऱ्यांवरून सतत चढ उतार केल्याने शरीराची हालचाल होते. शरीरातील रक्तप्रवाह वाढल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. मधुमेह झाल्यानंतर काहींना लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सतत पायऱ्यांवरून चढ उतार करावे. ज्या व्यक्तींना संधिवात किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे अशांनी हा व्यायाम करू नये.