मधाचे सेवन केल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
पोषक तत्वांनी समृद्ध असलेले मध आरोग्यसाठी फायदेशीर आहे. मधामध्ये विटामिन सी, विटामिन बी, प्रथिने, लोह, फायबर आणि तांबे इत्यादी पोषक घटक आढळून येतात. मधामध्ये नैसर्गिक गोडवा असल्याने अनेक लोक मध खातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मध आवडते. अनेकदा उचकी लागल्यानंतर किंवा तोंडाची बिघडलेली चव सुधारण्यासाठी मधाचे सेवन केले जाते. वाढलेले वजन कमी करण्यापासून ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मधाचा वापर केला जातो. पण पोषक तत्वांनी समृद्ध असलेले मध काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला मध खाल्ल्याने आरोग्यावर नेमके काय दुष्परिणाम होतात, याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाश्त्याचा पदार्थ शोधताय, तर नाश्त्यासाठी बनवा गुळाचे पोहे
मधुमेह या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी मधाचे सेवन करून नये. मधामध्ये असलेल्या गोडव्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. यामुळे आरोग्याचे नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी मधाचे सेवन करू नये. मधामध्ये आढळणारे फ्रुक्टोज हे साखरेचे स्रोत असतात, यामुळे शरीरातील साखर झपाट्याने वाढत जाते.
मधाचे सेवन केल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
पोटासंबंधित आजार असलेल्या रुग्णांनी मधाचे सेवन करू नये. तज्ज्ञांच्या मते, मधामध्ये असलेले फ्रक्टोज यकृताची स्थिती बिघडवू शकतात. त्यामुळे फॅटी लिव्हर, आतड्यांचा त्रास किंवा पोटासंबंधित विकार असलेल्या रुग्णांनी मधाचे सेवन करू नये.
हे देखील वाचा: ध्यान करताना मन विचलित होते? मग परफेक्ट Meditation साठी फॉलो करा या टिप्स
मधामध्ये असलेला नैसर्गिक गोडव्यामुळे हिरड्या आणि दातांचे आरोग्य बिघडू शकते. यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते. दातांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात कमी साखरेचे पदार्थ खाणे गरजेचे आहे. अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते. तसेच मधाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास हिरड्या खराब होऊ शकतात.
अनेकदा लहान वयातच मुलांना साखर किंवा मध भरवतात. याचा लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू येतो. लहान मुलांना मध भरवल्याने क्लोस्ट्रिडियम संसर्ग धोका वाढतो. त्यामुळे नवजात बालकांना आणि लहान मुलांना आईचे दूधच दिले पाहिजे. इतर कोणते पदार्थ लहान मुलांना देऊ नये.