
पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदीमध्ये मिक्स करा 'या' 2 गोष्टी,
वाढत्या वयानुसार केस पांढरी होणे एक सामान्य समस्या आहे. मात्र आजकाल अनेकांना कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवत आहे. याचे कारण प्रदूषण, चुकीच्या खाण्याच्या सवयी, खराब जीवनशैली आणि रासायनिक उत्पादनांचा वापर या गोष्टी असू शकतात. अनेक लोक आपले केस काळे करण्यासाठी बाजारातील कलरचा वापर करू पाहतात. मात्र यात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थांमुळे केस आणखीन खराब होण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीत तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे कारण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकतात. केस काळे करण्यासाठी मेहंदी एक उत्तम पर्याय आहे. हे फक्त पांढरे केस काळे करण्यास मदत नाही करत तर केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्यासदेखील मदत करते. आज आम्ही तुम्हाला घरातच मेहंदीचा लेप तयार करून केस काळी कशी करावी याचा एक सोपा उपाय सांगत आहोत.
हेदेखील वाचा – बोटांची त्वचा खरखरीत झाली आहे का? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, त्वचा होईल मऊ
जर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये मेहंदीचा कलर गडद आणि घट्ट हवा असेल तर तुम्ही मेंदी विरघळवून किमान 12 तास तशीच राहू द्या. अशाप्रकारे मेहंदीचा रंग केसांवर चांगला राहील. गडद रंगासाठी मेहंदी लोखंडाच्या भांड्यात विरघळवून घ्या. यामुळे रंग आणखीन घन होण्यास मदत होईल. काही लोक तेलकट केसांवर मेहंदी लावतात. अशात मेहंदीचा प्रभाव केसांवर तितका चांगला दिसून येत नाही किंवा खूप कमी प्रभाव दिसून येतो. या चुकीमुळे मेहंदी लावल्यानंतरही त्याचा परिणाम तुमच्या केसांवर दिसून येणार नाही. त्यामुळे ज्यादिवशी तुम्हाला केसांना मेहंदी लावायची असेल त्याच्या आधी आपले केस शॅम्पू ने धुवून घ्या.
जर तुम्ही कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या केसांसाठी लिंबू फायद्याचा ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही मेंदीच्या पेस्टमध्ये लिंबू मिसळले तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुमचे केस आणखी कोरडे होऊ शकतात.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.