Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिनाभर दैनंदिन रुटीनमध्ये नियमित करा ‘ही’ योगासने, आरोग्य राहील तंदुरुस्त

दैनंदिन जीवनात निरोगी जीवनशैली जगण्यासाठी अनेक लोक तासनतास जीममध्ये जाऊन घाम गाळतात. आहार तज्ज्ञांकडून वेगवेगळे डाईट घेतले जातात. पण याचा फारसा परिणाम आरोग्यावर दिसून येत नाही. त्यामुळे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नियमित योगासने केली पाहिजे. महिनाभर नियमित योगासने केल्यास आरोग्यावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 24, 2024 | 08:45 AM
महिनाभर सकाळी उठल्यावर नियमित करा 'ही' योगासने

महिनाभर सकाळी उठल्यावर नियमित करा 'ही' योगासने

Follow Us
Follow Us:

निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. सकाळी उठून नियमित व्यायाम करणे, योगासने करणे, आरोग्याला फायदेशीर असलेल्या पदार्थांचे सेवन करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण अनेकदा कामाच्या धावपळीमध्ये व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. यामुळे जीवनशैलीत बदल झाल्यानंतर आरोग्यसंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे घावपळीच्या जीवनातून वेळ काढत व्यायाम, योगासने केली पाहिजेत. नियमित योगासने व्यायाम केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. अशांत मनाला शांती मिळते.

तणावपूर्ण जीवनशैली जगत असताना शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. झोप न येणे, अपचन, सतत थकवा येणे, अशक्तपणा येणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे काम करत आरोग्याकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात व्यायाम करून आरोग्य आरोग्य सुधारू शकता. महिनाभर योगासने केल्यास त्याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येते. कोणतीही गोष्टी २१ दिवस केल्यानंतर तिची आपल्या आरोग्याला सवय होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला निरोगी जीवनशैली जगण्यासाठी कोणती योगासने केली पाहिजेत, याबद्दल सांगणार आहोत. ही योगासने नक्की करून पहा.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ व्यायाम प्रकार, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

नौकासन:

  • नौकासन करताना सगळ्यात आधी योग मॅटवर झोपा. त्यानंतर तुमचे दोन्ही पाय एकत्र करा.
  • पाय जवळ केल्याने शरीराजवळ ठेवून दीर्घश्वास घ्या.
  • त्यानंतर श्वास सोडून छाती आणि तुमचे दोन्ही पाय जमिनीपासूनवर उचला.
  • त्यानंतर तुमचे दोन्ही हात पायांच्या दिशेने खाली खेचा.
  • हे योगासन करताना हातांची आणि पायांची बोटे आणि तुमचे डोळे सरळ असायला हवेत.
  • यामुळे तुमच्या शरीराचा संपूर्ण मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होईल.
  • काही वेळ नौकासनात राहिल्यानंतर पुन्हा एकदा सामान्य स्थितीमध्ये या.
  • हे योगासने पहिल्यांदा करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
हे देखील वाचा: ही 8 फळे रात्री खाऊ नका, झोप आणि पचन बिघडेल.

धनुरासन:

  • धनुरासन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुद्धा चांगले राहते.
  • धनुरासन करताना सगळ्यात आधी योग मॅटवर झोपा. त्यानंतर दोन्ही हात पायांच्या जवळ ठेवा.
  • नंतर दोन्ही गुडघे वाकवून ते धरण्याचा प्रयत्न करा.
  • गुडघे धरून दीर्घ श्वास घेताना तुमची छाती वरच्या दिशेने उचला आणि हातानी पाय ओढा.
  • त्यानंतर श्वासाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. 20 ते 25 सेकंड या स्थितीमध्ये रहा.
  • धनुरासन केल्याने शरीराचा मानसिक तणाव निघून जाण्यास मदत होईल.

Web Title: Best yoga poses for healthy lifestyle health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 08:45 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.