
photo- yandex
Dehydration: वारंवार तहान, थकवा? शरीर देतंय इशारा! वेळीच ओळखा डिहायड्रेशनची लक्षणे, अन्यथा…
ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीन असते, जे शरीराचा मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. दुसरीकडे, तुपामध्ये हेल्दी फॅट्स, विशेषतः ओमेगा फॅटी अॅसिड्स आणि फॅट-सोल्युबल जीवनसत्त्वे असतात. या दोन्हींचे मिश्रण शरीराला दीर्घकाळ ऊर्जा पुरवू शकते. सकाळी रिकाम्या पोटी हे पेय घेतल्यास वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, तुपातील चांगले फॅट्समुळे पोट अधिक काळ भरलेले रोहते. त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते. ब्लॅक कॉफी मेटाबॉलिझम बूस्ट करण्यास मदत करते. या दोन्हींच्या एकत्रित सेवनामुळे, कॅलरी बर्निंग होते आणि वजन नियंत्रणात ठेवले ऊ शकते.
ब्लॅक कॉफी आणि तूप यांचे मिश्रण मेंदूला जलद ऊर्जा पुरवते. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटण्यास मदत होते. अनेक लोकांच्या मते, हे पेय घेतल्यानंतर कामात अधिक लक्ष केंद्रित करता येते आणि थकवा कमी जाणवतो.
तूप पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. ब्लॅक कॉफीसोबत तूप घेतल्यास काही लोकांना पचन अधिक सुरळीत राहिल्याचा अनुभव येतो.
हे पेय सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. ज्यांना कोलेस्टेरॉल, हृदयविकार किंवा कॅफीनची संवेदनशीलता आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन करावे. तसेच प्रमाणापेक्षा जास्त तूप किंवा कॉफी घेणे टाळावे.
आरोग्यदायी जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत ब्लॅक कॉफी व तुपाचे हे मिश्रण काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र कोणताही नवीन आहार ट्रेंड स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.