कमी बजेटमध्ये पूर्ण होईल परदेशी जाण्याचं स्वप्न; अवघ्या 30000 रुपयांत करा या देशांची सफर
अनेकांचे परदेशी जाण्याचे स्वप्न बजेटमुळे मागे राहून जातं. बहुतेक लोकांना वाटतं की परदेश प्रवास म्हणजे फार मोठा खर्च, त्यामुळे ते त्याचा विचारही करत नाहीत. पण खरं तर असं नाही. जगात काही देश असे आहेत जे भारताच्या तुलनेत फारच स्वस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा ५ देशांची माहिती सांगत आहोत जिथे कमी खर्चात तुम्ही पर्यटनाचा सुंदर आनंद लुटू शकता. इथे जाऊन तुम्ही त्या देशाची संस्कृती, नवीन ठिकाणं आणि असे अनेक अनुभव घेऊ शकता जे फक्त दुसऱ्या देशात जाऊन अनुभवता येतात. चला तर मग या यादीत कोणकोणत्या देशांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
विमानात 13 नंबरची रो रिकामी का ठेवली जाते? होश उडवून टाकेल यामागचे कारण
नेपाळ
नेपाळपासून करू शकता. भारताचा शेजारी देश असल्यामुळे बसने किंवा विमानाने सहज जाता येते. इथे ५
दिवसांची सहल २० हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात करता येते. नेपाळचे हिमालय पर्वतरांगांचे दृश्य मोहक आहे. काठमांडू, पोखरा, नागरकोट यांसारखी ठिकाणे आवर्जून बघण्यासारखी आहेत. इथलं स्ट्रीट फूडही किफायतशीर आहे.
थायलंड
थायलंडमध्ये सुंदर बीच, बेटे, नाईट मार्केट्स आणि फ्लोटिंग मार्केट्स पाहायला मिळतात. बौद्ध व हिंदू मंदिरे, थाई मसाज आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. बँकॉक आणि पटाया तुम्ही साधारण २५ हजार रुपयांत फिरू शकता.
श्रीलंका
भारताचा आणखी एक शेजारी देश म्हणजे श्रीलंका. समुद्रकिनारे, मंदिरे, चहा बागा, जंगल आणि डोंगर यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गासारखं आहे. चेन्नई ते कोलंबो फ्लाइट सुमारे १० हजार रुपयांत मिळते. ५ दिवसांचा खर्च २५ हजार रुपयांत भागतो. इथले लोक हिंदी, इंग्रजी आणि तमिळ बोलतात ही खास गोष्ट.
दुबई
योग्य नियोजन केल्यास दुबईलाही परवडणाऱ्या खर्चात भेट देता येते. दिल्लीहून थेट दुबई फ्लाइट महाग पडते, पण अबू धाबीपर्यंत फ्लाइट घेऊन तिथून बसने २ तासात दुबई गाठता येते. बुर्ज खलिफा, डेजर्ट सफारी, मॅजिक गार्डन, समुद्रकिनारे, मॉल्स आणि हायटेक संग्रहालये हे इथले आकर्षण. ३० हजार रुपयांत ५ दिवसांची सहल शक्य आहे.
कंबोडिया
कंबोडियाची प्राचीन संस्कृती आणि वारसा पाहण्यासारखा आहे. इथली चलनमूल्य भारताच्या रुपयाच्या तुलनेत कमी असल्यामुळे येथे कमी पैशांत जास्त भटकंती करता येते. अंगकोर वाट मंदिर इथले प्रसिद्ध स्थळ. स्थानिक बाजारपेठा आणि स्ट्रीट फूडही लोकप्रिय आहे. २५ ते ३० हजार रुपयांत इथली सफर करता येते.
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील
अशाप्रकारे कमी खर्चात करता येईल प्रवास