केस धुतल्यानंतर खूप जास्त गळतात? जावेद हबीब यांनी सांगितलेली केस धुवण्याची सोपी पद्धत
प्रत्येकालाच अतिशय घनदाट आणि काळेभोर केस हवे असतात. सुंदर केसांसाठी अनेक वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट किंवा शॅम्पूचा वापर केला जातो. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे हेअर केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. पण केस व्यवस्थित धुतले नाहीतर कोणतेही प्रॉडक्ट किंवा ट्रीटमेंट केसांसाठी प्रभावी ठरणार नाहीत. केस व्यवस्थित न धुतल्यामुळे टाळूवरील इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय केसांमध्ये कोंडा वाढतो, ज्यामुळे केस गळणे, केस कोरडे पडणे किंवा केस पांढरे होण्याची जास्त शक्यता असते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला वारंवार दुर्लक्ष करतात. पण केसांच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी हेअर स्टायलिश आणि हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केस धुवण्याची सोपी पद्धत सांगितली आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. योग्य पद्धतीने केस धुतल्यास केसांच्या बऱ्याच समस्या दूर होतील.(फोटो सौजन्य – istock)
जावेद हबीब यांनी सांगितल्यानुसार, केस स्वच्छ ठेवण्यासाठी केस व्यवस्थित धुवणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने केस धुतल्यास केसांच्या समस्या वाढू लागतात. यामुळे केस आठवड्यातून दोनदा व्यवस्थित स्वच्छ धुवावेत. केस धुवण्यासाठी प्री कंडिशनिंग करणे गरजेचे आहे. त्यासाठी सगळ्यात आधी केस व्यवस्थित ओले करून घ्या. त्यानंतर केसांना तेल लावा. तेल लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटं मसाज करून झाल्यानंतर काहीवेळ केस तसेच ठेवून द्या.
डोके स्वच्छ करण्यासाठी केस शॅम्पूच्या सहाय्य्यने स्वच्छ धुवून घ्यावे. केस धुवण्यासाठी तुम्ही साबणाचा सुद्धा वापर करू शकता. शिकेकाई, आवळा, रिठा इत्यादी पदार्थांपासून बनवलेल्या साबणाचा किंवा पावडरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. याशिवाय केस व्यवस्थित स्वच्छ होतात. केसांच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करावा.
पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती पद्धतीने बनवलेल्या ‘या’ हेअरमास्कचा करा वापर, दिसाल अधिक तरुण
केसांची काळजी व्यवस्थित काळजी घेतल्यास केस अतिशय सुंदर दिसतात. वारंवार केसांवर मशीन किंवा हेअर ट्रीटमेंट केल्यामुळे केसांची मूळ कमकुवत होऊन जातात. त्यामुळे केसांसंबधित समस्या वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष करू नये. केस धुण्यासाठी जेंटल शॅम्पूचा वापर करावा. यामुळे केस अतिशय मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते. याशिवाय केस स्वच्छ धुतल्यानंतर केसांना जास्त जोरात स्पर्श करू नये. यामुळे केसांना हानी पोहचते.नैसर्गिक पद्धतीने केस सुकवावे.