वयाच्या पन्नाशी अभिनेत्री श्वेता तिवारी कायमच दिसते तरुण! सौंदर्य टिकवण्यासाठी 'या' सवयी नियमित करा फॉलो
सर्वच महिलांना अभिनेत्रींप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. वाढत्या वयात सुद्धा तरुण दिसण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात. कधी स्किन बोटॉक्स करून घेतले जाते तर कधी फेशिअल करून त्वचा अधिक तरुण केली जाते. पण वारंवार स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते, ज्याचा परिणाम वाढत्या वयात चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्किन ट्रीटमेंटचा वापर करू नये. यामुळे त्वचेची नुकसान होते. महागड्या पार्लर ट्रीटमेंट्स, स्किन केअर प्रॉडक्ट्स इत्यादीचा चुकीचा पद्धतीने वापर केल्यामुळे त्वचा अधिकच खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य: Pinterest)
त्वचेचे सौंदर्य कायमच टिकवून ठेवण्यासाठी संतुलित आहार, भरपूर पाणी, शांत झोप आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. या सवयी फॉलो केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसून येतो. हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या ४२ व्या वर्षीसुद्धा कायमच तरुण आणि सुंदर दिसते.तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. तिच्या सौंदर्याची कायमच सगळीकडे मोठी चर्चा असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री श्वेता तिवारी तरुण आणि आकर्षक त्वचेसाठी कोणते स्किन केअर रुटीन फॉलो करते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्वचा सुंदर करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यास तुम्ही कायमच तरुण दिसाल.
श्वेता तिवारी चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी मुलतानी मातीपासून तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावते. यामुळे तिची त्वचा कायमच चमकदार दिसते. मुलतानी मातीच्या वापरामुळे त्वचेच्या छिद्रांमधील घाण बाहेर पडून जाते, त्वचेवर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी होते आणि त्वचा आतून डिटॉक्स होण्यास मदत होते. उन्हामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करावा.
मुलतानी मातीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये मुलतानी माती, दही, कच्चे दूध आणि गुलाब पाणी घेऊन मिक्स करा. त्यानंतर त्यात हळद आणि चंदन पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळा तसेच ठेवा. २० ते २५ मिनिटं फेसपॅक चेहऱ्यावर तसेच ठेवून द्या. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेवरील तेज कायम टिकून राहील. याशिवाय शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. रोजच्या आहारात हंगामी फळे, हिरव्या भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे.