Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना अंड, ना ओव्हन… घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी ‘चोको लावा केक’, शेफ रणवीर बरारने शेअर केली रेसिपी

Choco Lava Cake Recipe : मऊ केक आणि त्यातून वाहणारी चॉकलेटची धार... हीच तर चोको लावा केकची खरी खासियत. सर्वांच्या आवडीचा हा पदार्थ आता तुम्ही घरी देखील बनवू शकता आणि तेही ओव्हनशिवाय...

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 21, 2026 | 03:30 PM
ना अंड, ना ओव्हन... घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी 'चोको लावा केक', शेफ रणवीर बरारने शेअर केली रेसिपी

ना अंड, ना ओव्हन... घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी 'चोको लावा केक', शेफ रणवीर बरारने शेअर केली रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:
  • गरमागरम चोको लावा केक खायला फार छान लागतो.
  • हॉटेलपुरता मर्यादित असलेला चोको लावा केक आता तुम्ही घरी देखील बनवू शकता.
  • सुप्रसिद्ध भारतीय शेफ रणवीर बरार याने याची टेस्टी रेसिपी शेअर केली आहे.
केक म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. लहानच काय तर मोठ्यांनाही या पदार्थाने वेड लावलं आहे. आता केक तर अनेक प्रकारचे असतात पण मागील काही काळापासून चोको लावा केकची पसंती तरुणांमध्ये जरा जास्तीच वाढू लागली आहे. फ्रेंच शेफ मिशेल ब्रास यांनी हे केक बनवले होते, ज्यांनी दोन वर्षांच्या प्रयोगानंतर रेसिपीचा शोध लावला. हा केक गरमा गरम सर्व्ह केला जातो. याच्या मध्यभागी चॉकलेटचा लावा म्हणजेच चॉकलेट सिरप भरलेलं असून त्याला फोडतात पर्वतातून लावा निघावा तसं चॉकलेट बाहेर पडू लागतं. हीच गोष्ट या पदार्थाला आणखीन खास बनवते.

हिवाळ्यात बनवा मऊ लुसलुशीत बाजरीच्या पिठाची इडली, फायबरयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे पचनक्रिया राहील निरोगी

हा चोको लावा केक आपण अधिकतर हॉटेल्समध्येच खातो पण तुम्हाला माहिती आहे का? हा लज्जतदार पदार्थ आता तुम्हाला घरी देखील बनवता येऊ शकतो तेही त्याच ओरिजनल चवीसह. भारतीय शेफ रणवीर ब्रार याने चोको लावा केक आपल्याला घरी कसा तयार करता येईल याची एक सोपी रेसिपी शेअर केली आहे. रेसिपी थोडी वेळखाऊ असली तरी यानंतर मिळणारी चव मात्र तोंडावर रेंगाळणारी आहे. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य (लावा बनवण्यासाठी)

  • ½ कप थंड पाण
  • थंड पाणी
  • 3 टेबलस्पून तेल
  • 1 टीस्पून लिंबाचा रस
  • ⅓ कप पिठीसाखर
  • 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स
इतर साहित्य
  • चिमूटभर मीठ
  • २ टेबलस्पून कोको पावडर
  • अर्धा कप मैदा
  • अर्धा चमचा बेकिंग सोडा
  • १०० ग्रॅम डार्क चॉकलेट
  • १ टीस्पून बटर
  • २ टीस्पून मैदा
कृती
  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात थंड पाणी, तेल, लिंबाचा रस, पिठीसाखर आणि व्हॅनिला अर्क एकत्र करा आणि चांगले मिसळा आणि बाजूला ठेवून द्या.
  • आता, दुसऱ्या एका भांड्यात, मीठ, कोको पावडर, मैदा आणि बेकिंग सोडा एकत्र करा आणि चांगले मिसळा आणि यालाही बाजूला ठेवून द्या.
  • आता तुमच्या आवडीचा साचा घ्या आणि त्यात बटर लावा आणि फ्रीजरमध्ये ठेवा जेणेकरून बटर गोठेल.
  • काही वेळाने, साचा पुन्हा बाहेर काढा आणि साच्याच्या दोन्ही बाजूंना थोडे पीठ शिंपडा आणि नंतर पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवा.
  • तुम्ही तयार केलेले थंड पाण्याचे मिश्रण आधीच तयार केलेल्या कोरड्या मिश्रणात घाला आणि चांगले एकत्रित करा.
  • आता फ्रीजरमधून साचा काढा आणि तयार मिश्रणाचे २-३ चमचे पसरवा.
  • नंतर त्यात डार्क चॉकलेटचा एक छोटा तुकडा घाला आणि नंतर १-२ चमचे बटर घाला.
  • सर्व तयार साच्यांसाठी ही प्रक्रिया पुन्हा करा, नंतर भरलेले साचे एक किंवा दोन मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा.
  • केक साच्यात बसला की, तो गरम स्टीमरमध्ये ठेवा आणि ४-५ मिनिटे वाफवून घ्या.
  • अशाप्रकारे तुमचा चोको लावा केक तयार होईल, तो काळजीपूर्वक साच्यातून काढा आणि याला तुमच्या आवडीनुसार सजवा.
  • लक्षात ठेवा याची खरी मजा याला गरमा गरम खाण्यातच आहे.

Web Title: Chef ranveer brar shared the recipe of how to make choco lava cake at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Chef Ranveer Brar
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

जूसी-रिफ्रेशिंग टेस्ट, लिंबाच्या सुगंधाने भरपूर… तुम्ही कधी ‘लेमन केक’ खाल्ला आहे का? टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय
1

जूसी-रिफ्रेशिंग टेस्ट, लिंबाच्या सुगंधाने भरपूर… तुम्ही कधी ‘लेमन केक’ खाल्ला आहे का? टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

आता गोड खा, कोणत्याही गिल्टशिवाय… साखर-मैद्याशिवाय घरी बनवा प्रोटीन-रिच ‘ब्राउनी’, शेफने शेअर केली रेसिपी
2

आता गोड खा, कोणत्याही गिल्टशिवाय… साखर-मैद्याशिवाय घरी बनवा प्रोटीन-रिच ‘ब्राउनी’, शेफने शेअर केली रेसिपी

Recipe : उरलेल्या शिळ्या डाळीपासून बनवता येतील चटकदार अन् खमंग पराठे, एकदा खाल तर पुन्हा बनवाल
3

Recipe : उरलेल्या शिळ्या डाळीपासून बनवता येतील चटकदार अन् खमंग पराठे, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी
4

व्हेज खाण्यासाठी पर्वणी! आता घरी बनवा मऊ, रेशमी आणि शाही चवीचे ‘व्हेज गलौटी कबाब’, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.