Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल ‘वॉफल’, लहानच काय तर मोठेही होतील खुश

Waffal Recipe : मऊ, खमंग चवीचा वॉफल सकाळच्या नाश्त्यासाठी चांगला पर्याय ठरतो. लहानांनाच काय तर मोठ्यांनाही याची चव फार आवडते. तुम्ही घरीच अवघ्या मिनिटांत कॅफे स्टाईल वॉफल घरीच तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 08, 2026 | 08:15 PM
Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल 'वॉफल', लहानच काय तर मोठेही होतील खुश

Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल 'वॉफल', लहानच काय तर मोठेही होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • वॉफल हा एक पाश्चात्य नाश्त्याचा प्रकार आहे.
  • मऊ, हलक्या गोड चवीचा नाश्ता मध, चॉकलेट सिरप आणि फळांसोबत खाल्ला जातो.
  • तरुणांना याची चव फार आवडते अशात तुम्ही घरीच वॉफल तयार करू शकता.
आजकाल नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं आणि चविष्ट खाण्याची सवय अनेकांना लागली आहे. अशा वेळी वॉफल हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेला वॉफल हा एक लोकप्रिय पाश्चात्य पदार्थ आहे. विशेष म्हणजे हा पदार्थ मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो. मध, चॉकलेट सिरप, बटर किंवा फळांसोबत खाल्ला तर वॉफलची चव आणखी वाढते.

Sunday Special : रविवारची मेजवानी करा खास, घरी बनवा मसालेदार आणि खमंग चवीचा ‘चिकन पेपर फ्राय’

वॉफल हा पदार्थ मुख्यतः मैदा, दूध, अंडी आणि बटर यांच्यापासून बनवला जातो. वॉफल मेकरमध्ये तयार केल्यामुळे त्याला सुंदर चौकोनी डिझाइन मिळते. कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणारे वॉफल्स घरीही अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतात. विशेष म्हणजे हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठीही उत्तम आहे. जर तुम्हाला घरी कॅफे स्टाईल वॉफल बनवायचे असतील, तर खाली दिलेली सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

साहित्य

  • 1 कप मैदा
  • 1 कप दूध
  • 1 अंडे
  • 2 टेबलस्पून साखर
  • 2 टेबलस्पून वितळलेले बटर
  • 1 टीस्पून बेकिंग पावडर
  • 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • चिमूटभर मीठ
कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी

कृती

  • सर्वप्रथम एका बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, साखर आणि मीठ एकत्र करून चांगले मिक्स करा.
  • दुसऱ्या बाउलमध्ये अंडे फेटून घ्या. त्यामध्ये दूध, वितळलेले बटर आणि व्हॅनिला इसेन्स घालून नीट मिक्स करा.
  • आता कोरड्या मिश्रणात हे ओले मिश्रण थोडे थोडे घालत हलक्या हाताने मिक्स करा. गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या.
  • वॉफल मेकर गरम करून त्यावर थोडे बटर किंवा तेल लावा.
  • तयार केलेले बॅटर वॅफल मेकरमध्ये ओता आणि झाकण बंद करून 3–5 मिनिटे शिजू द्या.
  • वॉफल सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढा.
  • तयार वॅफलवर मध, चॉकलेट सिरप, बटर किंवा ताजे फळे घालून सर्व्ह करा. तुम्ही यावर साखरेची पिठी देखील घालून सजवू शकता.
  • गरमागरम कुरकुरीत वॉफल्स तुमचा नाश्ता किंवा स्नॅक्स आणखी खास बनवतील.

Web Title: Know how to make waffal at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.