Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCOD पासून केसांपर्यंत…. महिलांसाठी वरदान आहेत हे ‘लाडू’, रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा

Healthy Ladoo Recipe : असं म्हणतात की आरोग्याचा मार्ग हा तुमच्या ताटातून म्हणजेच आपण जे काही खातो त्यावर अवलंबून असतो. आम्ही सांगत असलेले हे काळे लाडू रोज खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 08, 2026 | 03:30 PM
PCOD पासून केसांपर्यंत.... महिलांसाठी वरदान आहेत हे 'लाडू', रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा

PCOD पासून केसांपर्यंत.... महिलांसाठी वरदान आहेत हे 'लाडू', रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा

Follow Us
Follow Us:
  • जसजसा वय वाढतं तसतसं महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
  • आज आम्ही तुमच्यासाठी एका पौष्टिक लाडवांची रेसिपी शेअर करत आहोत.
  • हे लाडू आरोग्याच्या अनेक समस्यांना दूर ठेवते आणि शरीर निरोगी बनवते.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, चुकीच्या आहारामुळे आणि सततच्या तणावामुळे महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. PCOD, हार्मोनल असंतुलन, केस गळणे, तसेच लवकर केस पांढरे होणे अशा समस्या आज अनेक महिलांमध्ये दिसून येतात. या समस्यांवर उपाय शोधताना अनेकजणी महागडे सप्लिमेंट्स किंवा उपचार घेतात. मात्र, अनेकदा यावरचा साधा आणि नैसर्गिक उपाय आपल्या स्वयंपाकघरातच उपलब्ध असतो.

Sunday Special : रविवारची मेजवानी करा खास, घरी बनवा मसालेदार आणि खमंग चवीचा ‘चिकन पेपर फ्राय’

अशाच एका पौष्टिक आणि आरोग्यदायी रेसिपीबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्याचे नाव आहे काळ्या तिळाचे पौष्टिक लाडू. हा एक प्रकारचा सुपरफूड स्नॅक आहे जो शरीराला आतून ताकद देतो. यात आयर्न, ओमेगा-3, कॅल्शियम आणि अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात, जे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. चला ही लाडू घरी कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेऊया.

हे लाडू खास का आहेत?

काळे तीळ:

काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात आणि हार्मोन संतुलन राखण्यासही सहाय्य करतात.

भोपळ्याच्या बिया:

भोपळ्याच्या बियांमध्ये जिंक भरपूर असते. जिंक केसांच्या वाढीसाठी उपयुक्त मानले जाते आणि केसांची चमक टिकवून ठेवण्यास मदत करते.

खजूर:

साखरेऐवजी खजूर वापरल्यामुळे हे लाडू अधिक पौष्टिक बनतात. खजूर आयर्नचा चांगला स्रोत असल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत होते.

साहित्य

  • 1 मोठा चमचा तूप
  • ½ कप काळे तीळ
  • ¼ कप जवस (अळशी)
  • ½ कप अक्रोड
  • ⅓ कप भोपळ्याच्या बिया
  • 10–12 बिया काढलेले खजूर
कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी

कृती 

  • सर्वप्रथम जाड तळाची कढई घ्या आणि त्यात मंद आचेवर एक चमचा तूप गरम करा.
  • गरम तुपात काळे तीळ, जवस, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया घाला.
  • हे सर्व मिश्रण मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे हलके भाजून घ्या. जास्त भाजू नका; फक्त हलका सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा.
  • भाजलेले मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड होऊ द्या.
  • थंड झालेल्या मिश्रणात बिया काढलेले खजूर घाला आणि मिक्सरमध्ये दरदरे वाटून घ्या. मिक्सर सतत चालवू नका, तर ‘पल्स’ मोडवर थोडे-थोडे फिरवा.
  • तयार झालेले मिश्रण एका भांड्यात काढा. त्याचे छोटे-छोटे भाग घेऊन हाताने दाबून गोल लाडू तयार करा.
  • लाडू तयार झाल्यावर ते 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवा, त्यामुळे ते व्यवस्थित सेट होतील.
  • हे पौष्टिक काळ्या तिळाचे लाडू रोज एक किंवा दोन खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि महिलांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरू शकतात.

Web Title: Black sesame seeds ladoo are highly beneficial for womens health recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Ladoo
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : वजन वाढत नाहीये? मग आहारात करा या शेकचा समावेश, महिनाभरात वजनात होईल वाढ
1

Recipe : वजन वाढत नाहीये? मग आहारात करा या शेकचा समावेश, महिनाभरात वजनात होईल वाढ

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची
2

Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच स्पेशल ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलड, नोट करा रेसिपी

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा, नोट करून घ्या रेसिपी
4

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चिझ-गार्लिक पराठा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.