Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : खास प्रसंगावेळी घरी बनवा गोडसर चवीची ‘तांदळाची फिरनी’, चव अशी की सर्वच होतील खुश

Rice Phirni Recipe : तांदळाची फिरनी ही दुधापासून बनवलेली एक दाटसर आणि मलईदार गोड डिश आहे. कोणत्या खास प्रसंगी तुम्ही घरी ही डिश तयार करून सर्वांनाच खुश करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 10, 2026 | 03:30 PM
Recipe : खास प्रसंगावेळी घरी बनवा गोडसर चवीची 'तांदळाची फिरनी', चव अशी की सर्वच होतील खुश

Recipe : खास प्रसंगावेळी घरी बनवा गोडसर चवीची 'तांदळाची फिरनी', चव अशी की सर्वच होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • तांदळाची फिरनी हा एक पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे.
  • खास प्रसंगी किंवा सणाच्या दिवशी हा पदार्थ खास करून घरी तयार केला जातो.
  • आज आपण तांदळाच्या फिरनीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
भारतीय गोड पदार्थांमध्ये फिरनी हा एक अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक डेझर्ट मानला जातो. खास सण, उत्सव किंवा घरी पाहुणे आले असतील तर गोड म्हणून फिरनी बनवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. फिरनीची खासियत म्हणजे ती खूपच क्रीमी, मऊ आणि सुगंधी असते. तांदळापासून बनवली जाणारी ही फिरनी दुधात शिजवून त्यात वेलची, केशर आणि ड्रायफ्रूट्स घालून अधिक स्वादिष्ट बनवली जाते.

Summer Drink : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवून देईल ‘शिकंजी’, पारंपरिक पेयाची रेसिपी जाणून घ्या

राइस फिरनी बनवण्यासाठी तांदूळ बारीक वाटून दुधात हळूहळू शिजवले जातात, त्यामुळे तिची टेक्स्चर खूपच स्मूद आणि क्रीमी होते. थंडगार फिरनी खाल्ल्यावर तिची गोड चव आणि वेलची-केशराचा सुगंध मन प्रसन्न करून टाकतो. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते. रमजान, दिवाळी किंवा कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही ही राइस फिरनी बनवून घरच्यांना आणि पाहुण्यांना नक्कीच खुश करू शकता. नोट करून घेऊयात याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • 1/4 कप तांदूळ
  • 1 लिटर दूध
  • 1/2 कप साखर
  • 1/2 टीस्पून वेलची पूड
  • 7-8 काजू (चिरलेले)
  • 7-8 बदाम (चिरलेले)
  • थोडे पिस्ते
  •  केशर
शरीरातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात प्या थंडगार काकडीचे ताक, पोटातील जळजळ होईल कमी

कृती

  • सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 30 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून तांदूळ थोडे जाडसर वाटून घ्या.
  • एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा आणि मध्यम आचेवर उकळी येऊ द्या.
  • दुधाला उकळी आली की त्यात वाटलेले तांदूळ घाला आणि सतत हलवत मंद आचेवर शिजू द्या.
  • तांदूळ शिजून मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात साखर घाला आणि नीट मिसळा.
  • यानंतर त्यात वेलची पूड, केशर आणि चिरलेले काजू-बदाम घालून पुन्हा हलवा.
  • फिरनी घट्ट आणि क्रीमी झाली की गॅस बंद करा आणि ती थोडी थंड होऊ द्या.
  • तयार फिरनी वाट्यांमध्ये काढा, वरून पिस्ते घाला आणि फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा.
  • थंडगार, सुगंधी आणि क्रीमी राइस फिरनी सणासुदीला किंवा जेवणानंतर डेझर्ट म्हणून सर्व्ह केली जाऊ शकते.

Web Title: How to make rice phirni at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.