Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Gut Health: संध्याकाळच्या वेळी लागलेली भूक भागवण्यासाठी गूळ आणि फुटाण्याचे सेवन करावे. यामध्ये असलेले फायबर, लोह आणि इतर आवश्यक पोषक घटक आतडे स्वच्छ ठेवण्यासोबतच पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यास मदत करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 23, 2026 | 08:15 AM
आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा 'या' पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा 'या' पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Follow Us
Follow Us:

आतडे स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय?
गूळ खाण्याचे फायदे?
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपाय?

Gut Health: दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. कामाच्या धावपळीमध्ये जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. तिखट, तेलकट आणि आंबट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे पोटावर चरबीचा घेर वाढतो, पचनक्रिया बिघडणे, बद्धकोष्ठता, खराब कोलेस्ट्रॉल इत्यादी असंख्य समस्या वाढू लागतात. शरीरसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कायमच दुर्लक्ष केले जाते, पण कालांतराने समस्या आणखीनच गंभीर होतात आणि शरीराला धोका निर्माण करतात. आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचन, आंबट ढेकर येणे तर काहीवेळा उलट्या, मळमळ होऊन अस्वस्थपणा जाणवू लागतो. या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गुळासोबत या पिवळ्या पदार्थाचे सेवन करावे. या पदार्थाच्या सेवनामुळे शरीराला असंख्य फायदे होतात.(फोटो सौजन्य – istock)

Women Health: मासिक पाळीच्या रक्ताला घाण वास का येतो? इनफेक्शन वाढल्यास दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

नेहमीच विकतचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी घरातील पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. गूळ आणि भाजलेले फुटाणे नियमित खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारची हलकी भूक भागवण्यासाठी गूळ आणि फुटाणे खावेत. या दोन्ही पारंपरिक पदार्थाना आयुर्वेदासुद्धा खूप दर्जा आहे. गूळ आणि फुटाणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेतच, पण योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. अन्यथा शरीरसंबंधित समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकतात. कोणत्याही पदार्थाचे सेवन करताना त्याची पोषण मूल्य ओळखूनच पदार्थांचे सेवन करावे.

पोषकतत्वाचा खजिना:

भाजलेले चणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. भाजलेल्या फुटाण्यांमध्ये प्रथिने, डाएटरी फायबर, लोह आणि इतर सूक्ष्म पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामध्ये असलेल्या प्रोटीन आणि फायबरमुळे भूक वेगाने शांत होते आणि पोट भरलेले राहते. इतर पदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. साखरेपेक्षा गूळ शरीरासाठी खूप जास्त गुणकारी आहे. मधुमेहाने त्रस्त असलेले रुग्ण साखरेऐवजी गुळाचे सेवन करू शकतात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी प्रभावी:

रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर अनेक लोक आहारातून गोड पदार्थ कायमचे खाणे बंद करून टाकतात. गोड पदार्थांचे अजिबात सेवन केले जात नाही. पण गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करण्याऐवजी आहारात गुळाचा समावेश करावा. गूळ आणि मूठभर फुटाणे खाल्ल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहील आणि रक्ताची पातळी संतुलित राहण्यास मदत होईल. याशिवाय वजन कमी करताना सुद्धा फुटाण्यांचा आहारात समावेश केला जातो. पण फुटाणे आणि गूळ अतिप्रमाणात खाल्ल्यास शरीरात जास्त कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स वाढू शकतात.

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते:

फुटाणे खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक फायबर मिळतात तर गुळाचा आहारात समावेश केल्यास शरीराला लोह मिळते. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी फुटाणे खाऊ शकता. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळे आणि भरपूर पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुळासोबत हळद खाल्ल्याने आतड्यांमध्ये साचलेली ‘कुजलेली घाण’ निघून जाते का?

    Ans: आतड्यांमध्ये ‘कुजलेली घाण’ साचून राहते आणि एखादा पदार्थ ती मुळापासून साफ करतो, असे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. शरीराची पचनसंस्था आणि आतड्यांची नैसर्गिक हालचालच कचरा बाहेर टाकण्याचे काम करते.

  • Que: गुळासोबत हळद खाल्ल्याने पचनक्रियेला फायदा होतो का?

    Ans: हळदीतील कर्क्युमिनवर आरोग्याशी संबंधित विविध संशोधन झाले आहे; मात्र गुळासोबत हळद घेतल्याने पचनसंस्था ‘डीटॉक्स’ होते, असा ठोस पुरावा नाही.

  • Que: गुळामुळे पोटावरची चरबी कमी होते का?

    Ans: नाही. गूळ हा देखील साखरेचा स्रोत आहे आणि त्याचे जास्त सेवन केल्यास अतिरिक्त कॅलरी वाढू शकतात. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एकूण आहार, शारीरिक हालचाल आणि कॅलरी संतुलन महत्त्वाचे आहे.

Web Title: Gut health can jaggery and this yellow ingredient help cleanse the gut and reduce belly fat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • gut health
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
1

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
2

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.