
१४ नोव्हेंबर बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी ‘बाल दिन 2024’ साजरा केला जातो. आज देशभरात ‘बालदिन’ साजरा केला जाणार आहे. चाचा नेहरूंचा मुलांवर खूप जीव होता आणि त्यांना प्रेम आणि जिव्हाळा होता. मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. यासाठी नेहरूजींच्या जयंतीनिमित्त ‘बालदिन’ साजरा केला जाऊ लागला. या दिवशी शाळांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. बालदिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांचा विकास, शिक्षण आणि हक्क याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे.
हा दिवस लहान मुलांसाठी आहे. हा विशेष दिवस प्रत्येक मुलाला समर्पित आहे. लोक हा दिवस त्यांच्या आनंदाचा आणि विकासाचा उत्सव म्हणून साजरा करतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ मुले शाळांमध्ये कविता आणि गाणीही वाचतात. तुम्हालाही हा दिवस तुमच्या मुलांसाठी खास बनवायचा असेल आणि बालदिनानिमित्त त्यांना प्रेमळ शुभेच्छा पाठवायच्या असतील तर नक्कीच तुम्ही या लेखातील खास शुभेच्छांचा वापर करून घेऊ शकता. (फोटो सौजन्य – Canva)
1. आम्ही चाचा नेहरूंची लाडकी मुले
पालकांचीही प्रिय मुले
तो पुन्हा एकदा आला आहे
चाचा नेहरूंचा वाढदिवस
चला एकत्र साजरे करूया, बालदिन
बालदिनाच्या शुभेच्छा!
मुलांना द्या खास मराठीत बालदिनाच्या शुभेच्छा
2. प्रत्येक मूल आहे खास, मोठे होऊन नक्कीच करणार जगाचा विकास
बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
3. मुले आहेत देशाच्या प्रगतीचा आधार
मोठी होऊन करणार चाचा नेहरूंची स्वप्नं साकार
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
4. रडण्याचे कारण नाही
आणि हसायला निमित्त नाही
बालपण असे आहे की ते प्रत्येक मुलाने मुक्तपणे घालवावे
तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
घरातील चिमुकल्यांसाठी मनःपूर्वक बालदिन शुभेच्छा
5. आज सर्व मुलांचा दिवस आहे
निर्मळ हृदय आणि कोमल भावना
लाडक्या मुलांसाठी प्रत्येक दिवसच सारखा
तरीही करूया आजचा दिवस खास
२०२४ च्या बालदिनाच्या शुभेच्छा!
6. मोठं झाल्यावर येते बालपणीची आठवण
सर्वच होते अगदी अवखळ
आजही व्हावे वाटते पुन्हा लहान
बालदिनाच्या मनापासून शुभेच्छा देत पुन्हा एकदा जगावं बालपण!
7. बालपण आहे आयुष्यातील असा खजिना
कधीच मिळणार नाही पुन्हा हा जीवना
कठीण आहे विसरणं आठवण
बस देवा पुन्हा एकदा मिळू दे बालपण
बालदिनाच्या शुभेच्छा!
मुलांचा बालदिन करा अधिक खास पाठवा शुभेच्छा संदेश मराठीत
8. आम्ही आहोत लहान बच्चे
नेहमीच ठरतो मनाने सच्चे
कधीच नाही अश्रू ढाळत
कारण आहोत सरळ साधे आणि सच्चे
9. मुलांना श्रीमंत होण्यासाठी नका शिकवू
आनंदी राहण्यासाठी शिकवा
द्या अशी शिकवण की
मोठं होऊनही जपता येईल बालपण
बालदिनाच्या शुभेच्छा!
10. ती आईची गोष्ट होती, पऱ्यांच्या राज्यात होती बेस्ट कहाणी
पावसात कागदाची बोट होती
बालपणीचा प्रत्येक ऋतू आनंददायी होता
हाच ऋतू पुन्हा हवाय आयुष्यात
कारण जगायचंय पुन्हा बालपणात
11. जगातील सर्वात खरी वेळ
जगातील सर्वोत्तम दिवस
जगातील सर्वात सुंदर क्षण
फक्त बालपणात सापडते
तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छा संदेश पाठवून करा बालदिन साजरा
12. बालपणातील सर्वात जास्तवेळा विचारला जाणारा प्रश्न:
तुम्ही मोठे झाल्यावर काय होणार?
ज्याचं उत्तर मला आता सापडलंय
मला पुन्हा लहान मूल व्हायचे आहे
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
13. जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण विकत घेऊ शकत नाही
त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपले बालपण
बालपणीचे दिवस लक्षात ठेवा आणि एन्जॉय करा
14. ना सकाळची काळजी होती
ना संध्याकाळच्या वेळेचा पत्ता होता
थकून फक्त शाळेतून येणं
पण खेळायला जाणं होतं पक्कं
हीच ती बालपणीची आठवण
बालदिनाच्या शुभेच्छा
15. बालपणीचा काळ होता
जेव्हा तो आनंदाचा काळ होता
मला चंद्रावर पोहोचायचे होते
पण माझ्या मनाला फुलपाखराचं वेड लागलं होतं
आणि आता सगळं मिळतंय
पण पुन्हा वेध लागलेत ते बालपणाचे
हेदेखील वाचा – तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर प्रियजनांना द्या खास शुभेच्छा