Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Childrens Health Tips: ताप, खाज आणि अंगावर फोड! कांजिण्यांची लक्षणं दिसताच पालकांनी काय करावं? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

chickenpox in children vaccination for toddlers: मुलाच्या १२ ते २४ महिन्यांच्या वयात प्ले-ग्रुप, डे-केअर आणि इतर ठिकाणी वाढणाऱ्या संपर्कामुळे कांजिण्यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 22, 2026 | 06:13 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • मुलांच्या वाढत्या वयात संसर्गाचा धोका
  • कांजिण्यांपासून संरक्षणासाठी लसीकरण महत्त्वाचे
  • कांजिण्यांबाबत पालकांसाठी महत्त्वाची माहिती

मुलाच्या आयुष्यातील दुसरे वर्ष त्यांच्या विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. वयाच्या १२ ते २४ महिन्यांच्या दरम्यान बालकाची रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असते. आणि प्ले-ग्रुप, डे-केअर, कौटुंबिक स्नेहसंमेलने, प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी जाण्यामुळे त्यांचा सामाजिक संवाद वाढत असतो. लहान मुले अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येतात, तेव्हा संसर्गजन्य आजारांची लागण होण्याचा धोकाही वाढू शकतो. कांजिण्या (चिकनपॉक्स) हा संसर्गजन्य आजार आहे, ज्याकडे पालकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नवी मुंबई येथील, मदरहूड हॉस्पिटलचे, निओनॅटॉलॉजी अँड पेडियाट्रिक्स, लीड कन्सल्टंट डॉ. अनिश पिल्लई यांनी कांजिण्यापासून मुलांची कशी काळजी घ्यायची. याबाबतची माहिती सांगितली आहे.

Skin Care Tips: कोलेजन क्रीम अन् सप्लिमेंट्स खरंच काम करतात? की फक्त मार्केटिंगचा खेळ; तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

कांजिण्याबाबत जाणून घ्या

कांजिण्या हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे, जो बाधित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्याने आणि हवेतील थेंबांद्वारे (ड्रॉपलेट्स) सहज पसरतो. या आजारात सामान्यतः खाज येणारे पुरळ, पाण्याने भरलेले फोड (ब्लिस्टर्स), ताप आणि अस्वस्थता जाणवते . काही केसेसमध्ये यामुळे अंगावर व्रण किंवा डाग राहू शकतात, ज्याचा मानसिक परिणाम हा आजार बरा झाल्यानंतरही दीर्घकाळ टिकून राहू शकतो. कांजिण्यांमुळे दैनंदिन नित्यक्रम देखील विस्कळीत होते, जिथे बरे होईपर्यंत मुलांना डे-केअर आणि इतर सामाजिक क्रियाकलापांपासून दूर राहावे लागते. परिणामी, पालक आणि केअरगिव्हर्सवर देखील याचा परिणाम होतो.बहुतेक मुले या आजारातून पूर्णपणे बरी होत असली, तरी कांजिण्यांमुळे कधी-कधी डिहायड्रेशन, न्यूमोनिया आणि यकृताच्या समस्यांसारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.

chickenpox in children

याच कारणामुळे पालकांनी आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी वयानुसार वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे. कांजिण्यांकडे केवळ “लहान मुलांचा सामान्य आजार” म्हणून दुर्लक्ष केले जाऊ नये. हा प्रतिबंध करण्यायोग्य संसर्ग आहे, जो मुलाचे आरोग्य, दैनंदिन नित्यक्रम आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम करू शकतो. मुलाला संसर्ग होण्याची वाट पाहण्यापेक्षा पालकांनी शिफारस केलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रकाबाबत पेडियाट्रिशियनशी वेळीच चर्चा करावी.

दुसऱ्या वर्षीही लसीकरण महत्त्वाचे

मुलाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पालकांचे लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष होऊ शकते, विशेषतः मूल निरोगी दिसते आणि डॉक्टरांकडे जाणे कमी होते. दुसऱ्या वर्षात द्यावयाच्या लसींकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा लस देण्यास उशीर झाल्यास संरक्षणात त्रुटी निर्माण होऊ शकतात. कांजिण्यांसाठी शिफारस केलेले लसीकरण साधारणपणे दोन डोसचे वेळापत्रक असते, ज्यामध्ये पहिला डोस वयाच्या १५ व्या महिन्यात आणि दुसरा डोस १८ व्या महिन्यात दिला जातो.

शिफारस केलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून पालक लसींद्वारे प्रतिबंध करता येणाऱ्या आजारांपासून मुलांचे रक्षण करण्यास आणि त्यांच्या निरोगी वाढीस व आरोग्यास मदत करू शकतात.

गर्भधारणा होत नाहीये? शुक्राणूंची गुणवत्ता चांगली असूनही अडथळा? पुरुषांच्या ‘या’ समस्यांही असू शकतात कारण

💡

Frequently Asked Questions

  • Que: कांजिण्या म्हणजे काय?

    Ans: कांजिण्या हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. यावेळी खाज येणारे पुरळ, पाण्याचे फोड आणि ताप येऊ शकतो.

  • Que: लहान मुलांना कांजिण्यांचा धोका कधी वाढतो?

    Ans: प्ले-ग्रुप, डे-केअर आणि इतर ठिकाणी अनेक लोकांच्या संपर्कात आल्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.

  • Que: कांजिण्यांची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: खाज येणारे पुरळ, पाण्याने भरलेले फोड, ताप आणि अस्वस्थता जाणवणे ही कांजिण्यांची सामान्य लक्षणे आहेत.

Web Title: Childrens health tips chickenpox in children symptoms vaccination prevention pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Child Health
  • health care news
  • Vaccination For children

संबंधित बातम्या

USA News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय ;महिलांच्या आरोग्यसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष टास्क फोर्स
1

USA News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय ;महिलांच्या आरोग्यसाठी व्हाईट हाऊसमध्ये विशेष टास्क फोर्स

Cortisol Hormone:सकाळी उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

Cortisol Hormone:सकाळी उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.