Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cortisol Hormone:सकाळी उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Cortisol Hormone: शरीरात कॉर्टिसॉल हॉर्मोनचे संतुलन बिघडल्यानंतर अनेक वेगवेगळे बदल दिसू लागतात. उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यामुळे हार्मोन्सच्या पातळीमध्ये सतत चढ उतार होत असतात. त्यामुळे उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 17, 2026 | 05:30 AM
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Follow Us:

Cortisol Hormone: आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली झाल्यासारखे वाटत नाही. पण वारंवार चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कॉफीमुळे शरीर ताजेतवाने वाटते, एकाग्रता वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. पण झोपेतून उठल्यानंतर लगेच कॉफी प्यायल्याने शरीरातील नैसर्गिक ‘कॉर्टिसॉल रिदम’ बिघडून जाते. यामध्ये असलेल्या कॅफिन आणि कॉर्टिसॉलमुळे शरीरात हार्मोनल बदल होतात, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. चला तर जाणून घेऊया कॉर्टिसॉल हॉर्मोन बिघडल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)

Breast Cancer Awareness: कौटुंबिक इतिहास नाही, लक्षणे नाहीत; तरीही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

कॉर्टिसॉल हार्मोन

कॉर्टिसॉल हे शरीरातील अतिशय महत्वाचे हार्मोन आहे. शरीराला झोपेतून जागे करण्याचे यंत्र, चयापचय, रक्तदाब, ताणतणावाचा सामना करण्यास मदत करते. कॉर्टिसॉलची पातळी दिवसभर सतत बदलत राहते. काहींना ठराविक वेळेत कॉफी पिण्याची सवय असते. अनेकांना सकाळच्या वेळी खूप कॉफी पिणे फायदेशीर वाटते. कॉफीचे सेवन केल्यामुळे चिंता, छातीत धडधडणे, ॲसिडिटी किंवा झोपेत अडथळा इत्यादी समस्या उद्भवतात, असे कायमच सगळ्यांचं वाटते. पण असे नसून ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीराला फायदे होतात. कॉर्टिसॉलच्या भीतीपोटी सकाळी कॉफीच्या वेळी कॉफी पिण्याची सवय बंद करणे आवश्यक नाही.

सकाळी उठल्याबरोबर कॉफी घेतल्यास काहींना अस्वस्थ किंवा चलबिचल वाटते तर काहींना ऊर्जेची पातळी अचानक खालावल्यासारखी वाटते. त्यामुळे घराबाहेर जाताना उपाशी पोटी कॉफी किंवा चहा पिण्याऐवजी नाश्ता करूनच बाहेर पडावे. कॅफीनचा परिणाम वाढल्यानंतर शरीरात अचानक प्रचंड थकवा किंवा ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटू लागते. याशिवाय अचानक झोप येणे, काम न करण्याची इच्छा न होणे, शरीरात तणाव वाढणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करणे टाळावे.

तरुणांमध्येही वाढतेय पाठदुखी! मणक्याच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

कॉफी पिण्याची योग्य पद्धत:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये. चहा कॉफी पिण्याऐवजी हर्बल पेयांचे सेवन करावे. निरोगी प्रौढ व्यक्तींसाठी दररोज ३०० ते ४०० मिलीग्रॅम कॅफिन पिणे सुरक्षित मानले जाते. त्यामुळे दिवसभरात दोनदा किंवा तीनदाच कॉफीचे सेवन करावे. कॉफी सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी कोणत्याही पदार्थांसोबत प्यावी. संध्याकाळी किंवा रात्री उशिरा कॉफी प्यायल्यास रात्रीच्या झोपेच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे उपाशी पोटी किंवा रात्री चहा कॉफी पिऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॉर्टिसॉल हार्मोन म्हणजे काय?

    Ans: कॉर्टिसॉल हे शरीरातील ताणाला प्रतिसाद देणारे हार्मोन आहे. ते रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब, चयापचय आणि झोप-जागेपणाच्या चक्राचे नियमन करण्यात मदत करते.

  • Que: सकाळी उठल्यानंतर कॉर्टिसॉलची पातळी वाढते का?

    Ans: होय. सकाळी जाग आल्यानंतर कॉर्टिसॉलची पातळी नैसर्गिकरीत्या वाढते. यामुळे शरीराला जागे होण्यास आणि दिवसभराच्या कामांसाठी तयार होण्यास मदत होते.

  • Que: उपाशी पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने कॉर्टिसॉल वाढते का?

    Ans: कॅफिनमुळे काही व्यक्तींमध्ये कॉर्टिसॉलची पातळी तात्पुरती वाढू शकते. मात्र, उपाशी पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने प्रत्येक व्यक्तीमध्ये हार्मोनचा असमतोल निर्माण होतो, असे ठोस पुरावे नाहीत.

Web Title: Cortisol hormone do you drink tea or coffee on an empty stomach in the morning watch out for these symptoms sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • coffee addiction
  • health care news
  • health issue

संबंधित बातम्या

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी
1

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
2

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या
3

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.