Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॉकलेट लव्हर्स… कधी Earthquake Cake खाल्ला आहे का? चवीने भरपूर घरीच करा तयार

केक कुणाला खायला आवडत नाही? गोड आणि मऊ चवीचा हा पदार्थ खास प्रसंगी आवर्जून घरी बनवला किंवा बाहेरून खरेदी केला जातो. केकचे अनेक प्रकार बाजारात आहेत मात्र तुम्ही कधी अर्थक्वेक केक खाल्ला आहे का? नोट करूया रेसिपी!

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 11, 2025 | 08:15 PM
चॉकलेट लव्हर्स... कधी Earthquake Cake खाल्ला आहे का? चवीने भरपूर घरीच करा तयार

चॉकलेट लव्हर्स... कधी Earthquake Cake खाल्ला आहे का? चवीने भरपूर घरीच करा तयार

Follow Us
Close
Follow Us:

अर्थक्वेक केक नाव ऐकताच तुम्ही कोड्यात पडला असाल तर चिंता करू नका… ऐकायला विचित्र असला तरी या केकची चव इतर केकहुन फार छान लागते. चवदार, मलईदार आणि थरथराट करणारा एक अनोखा केक! या केकमध्ये चॉकलेट, नारळ, पेकान किंवा अक्रोड आणि क्रीम चीजचा अनोखा संगम असतो. “अर्थक्वेक” म्हणजे भूकंप, या केकला हे नाव यासाठी दिलं जातं कारण बेक करताना त्यातले घटक थर थर करून हालचाल करतात आणि वरून फाटलेले, खवलेले रूप येते, जे पाहून जणू जमिनीला तडा गेला आहे असे वाटू लागते.

साध्या भाजीला द्या शाही ट्विस्ट! घरी बनवा रिच आणि स्वादिष्ट Egg Nawabi; लज्जतदार चवीने सर्वच होतील खुश

हा केक जितका दिसायला वेगळा आहे, तितकाच चवीलाही भन्नाट असतो. बर्थडेसाठी किंवा कोणत्या खास प्रसंगी गोड सर्व्ह करायचे असल्यास तुम्ही अनोख्या केकची ही रेसिपी फॉलो करू शकता. केकचा हा हटके प्रकार नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. विशेषतः चॉकलेट लव्हर्सना तर हा केक आणखीनच आवडेल. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • डार्क चॉकलेट केक मिक्स – १ पाकीट (Ready-made, बाजारात सहज मिळतो)
  • नारळ किस (सुका किंवा ओलसर) – ½ कप
  • अक्रोड / पेकान नट्स (चिरलेले) – ½ कप
  • क्रीम चीज – १ कप (सॉफ्ट केलेले)
  • लोणी (Butter) – ½ कप (विघळवलेले)
  • पिठीसाखर – २ कप
  • दूध – केक मिक्ससाठी आवश्यकतेनुसार (मिश्रणावर लिहिल्याप्रमाणे)
  • अंडी – ३ (केक मिक्ससाठी आवश्यकतेनुसार)

तुम्ही कधी Paneer Shawarma खाल्ला आहे का? मऊ ब्रेडमध्ये रोल केलेले स्मोकी आणि झणझणीत पनीर खाल तर फॅन व्हाल

कृती:

  • अर्थक्वेक केक तयार करण्यासाठी सर्वप्रथम ओव्हन १७५°C (३५०°F) वर प्रीहीट करा.
  • केक ट्रे ग्रीस करून त्यात सर्वप्रथम नारळ किस आणि त्यावर अक्रोड पसरवा.
  • केक मिक्स, दूध, अंडी एकत्र करून एकसंध मिश्रण तयार करा.
  • एका बाउलमध्ये क्रीम चीज, वितळलेले लोणी आणि पिठीसाखर एकत्र करून फेटून घ्या.
  • नारळ-अक्रोड थरावर आधी चॉकलेट केक मिक्स पसरवा. त्यावर चमच्याने क्रीम चीजचं मिश्रण ओता.
    ४५-५० मिनिटे केक चांगला बेक करा
  • केक बेक झाला की नाही ते तपासण्यासाठी केकच्या मधोमध सुरी घाला, सूरी कोरडी बाहेर आली तर समजून जा तुमचा केक चांगला बेक झाला आहे.
  • पूर्णपणे थंड झाल्यावर केकचे तुकडे करून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • क्रीम चीजचा थर वर वर दिसेलच असं नाही, पण चवमध्ये तो भारी जाणवतो.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावर थोडासा चॉकलेट सिरप किंवा पावडर साखर शिंपडू शकता.

Web Title: Chocolate lovers have you ever try earthquake cake make it at home for a delicious treat recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्याला बनवा ज्वारीच्या पिठाची आंबोळी; अवघ्या १० मिनिटांतच तयार होईल रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्याला बनवा ज्वारीच्या पिठाची आंबोळी; अवघ्या १० मिनिटांतच तयार होईल रेसिपी

गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय, नोट करा रेसिपी
2

गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय, नोट करा रेसिपी

कुळथाची पिठी कशी बनवायची? चवीला भारी, आरोग्यालाही पौष्टिक… वासाने स्वयंपाकघरात सुटेल घमघमाट; लगेच नोट करा रेसिपी
3

कुळथाची पिठी कशी बनवायची? चवीला भारी, आरोग्यालाही पौष्टिक… वासाने स्वयंपाकघरात सुटेल घमघमाट; लगेच नोट करा रेसिपी

कोलकाता फेमस पुचका आता घरीच बनवा; मसालेदार स्टफिंग, कुरकुरीत पुरी आणि चटकेदार पाण्याची चव; नाश्त्यासाठीची परफेक्ट रेसिपी
4

कोलकाता फेमस पुचका आता घरीच बनवा; मसालेदार स्टफिंग, कुरकुरीत पुरी आणि चटकेदार पाण्याची चव; नाश्त्यासाठीची परफेक्ट रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.