Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता कोलेस्ट्रॉल होईल नष्ट! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयी शरीरासाठी ठरतील फायदेशीर

रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. जीवनशैलीत केलेले छोटे मोठे बदल शरीरासाठी फार महत्वाचे ठरतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2026 | 05:30 AM
कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता कोलेस्ट्रॉल होईल नष्ट! दैनंदिन जीवनातील 'या' सवयी शरीरासाठी ठरतील फायदेशीर

कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता कोलेस्ट्रॉल होईल नष्ट! दैनंदिन जीवनातील 'या' सवयी शरीरासाठी ठरतील फायदेशीर

Follow Us
Follow Us:

कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाय?
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

जगभरात हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. पण कालांतराने लक्षणांमध्ये वाढ होते आणि आरोग्य बिघडू लागते. सततच्या धावपळीमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. पण याचे परिणाम शरीरावर अतिशय वाईट होतात. बैठ्या जीवनशैलीच्या परिणामामुळे आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल शरीरासाठी अतिशय घातक आहे.(फोटो सौजन्य – istock)

हातापायांमध्ये कायमच झिणझिण्या येतात? हात पाय सुन्न होऊन जातात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

तरुण वयात लिव्हरसबंधित आजार आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे शरीराला गंभीर हानी पोहचते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डॉक्टर गोळ्या औषधांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे रक्त पातळ होण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी गोळ्या औषधांचे सेवन न करता जीवनशैलीत कोणते बदल करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जीवनशैलीतील बदलांचा शरीरावर लगेच परिणाम दिसून येतो. यामुळे कोलेस्ट्रॉसह शरीरसंबंधित इतर आजार कमी होतात.

कोलेस्ट्रॉलचा धोका कशामुळे वाढतो?

आहारात खाल्लेले तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते. हीच चरबी रक्तवाहिन्यांमध्ये वाढल्यामुळे हृदयाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या कोलेस्टरॉलमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात डोळ्यांच्या पापण्यांवर पिवळसर डाग, छातीत वेदना, श्वास घेताना त्रास, सतत थकवा जाणवणे किंवा पायांमध्ये गोळे येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरात वाढलेल्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

मेथी दाण्यांचे पाणी:

रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथी दाणे खावेत. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे घालून पाण्यात भिजत ठेवा.रात्रभर मेथी दाणे पाण्यात भिजू द्यावेत. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास मेथी दाण्यांचे पाणी आणि दोन किंवा तीन दाणे मेथी चावून खाल्ल्यास महिनाभरात कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी कमी होण्यास मदत होते. रक्तात साचलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन आवर्जून करावे. महिनाभरातच फरक दिसून येईल.

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीरातील नसा होतील कमजोर, शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास नसा होतील निकामी

आहारात बदल:

कोलेस्ट्रॉल किंवा शरीरसंबंधित गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात बदल करणे फार गरजेचे आहे. आहारात केलेला बदल शरीरावर सकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. रोजच्या आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. जास्ती तिखट किंवा तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नये. हृदयावर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी राजमा आणि विविध डाळींचा आहारात समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Cholesterol will be destroyed without consuming any pills these habits of daily life will be beneficial for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol control news
  • Cholesterol home Remedy

संबंधित बातम्या

नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे होईल नष्ट! आहारात करा ‘या’ फायबर युक्त पदार्थांचा समावेश, हृदयाला मिळेल पोषण
1

नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे होईल नष्ट! आहारात करा ‘या’ फायबर युक्त पदार्थांचा समावेश, हृदयाला मिळेल पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.