Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Christmas 2025 : ख्रिसमसची मजा होईल द्विगुणित, यंदा घरीच बनवा सर्वांच्या आवडीचा ‘प्लम केक’; रेसिपी नोट करा

Plum Cake Recipe : ख्रिसमस आणि प्लम केकच नातं जरा आगळचं... भरपूर ड्रायफ्रूट्स, संत्र्याचा ज्यूस आणि मैदा घालून बनवलेला हा केक चवीला फार अप्रतिम लागतो. तुम्ही घरीदेखील बेकरीसारखा टेस्टी प्लम केक तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 10, 2025 | 03:30 PM
Christmas 2025 : ख्रिसमसची मजा होईल द्विगुणित, यंदा घरीच बनवा सर्वांच्या आवडीचा 'प्लम केक'; रेसिपी नोट करा

Christmas 2025 : ख्रिसमसची मजा होईल द्विगुणित, यंदा घरीच बनवा सर्वांच्या आवडीचा 'प्लम केक'; रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • दरवर्षीप्रमाणे यंदाही २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जाणार आहे
  • या सणानिमित्त प्लम केक बनवण्याची आणि खाण्याची जुनी पद्धत आहे
  • बाजरात कशाला तुम्ही घरीही सोप्या पद्धतीमध्ये हा केक तयार करू शकता
ख्रिसमस स्पेशल प्लम केक ही प्रत्येक घरात साजरी होणाऱ्या ख्रिसमसच्या आनंदाची एक खास गोड परंपरा आहे. हिवाळ्यातील थंड हवेमध्ये घरभर पसरणारा मसाल्यांचा सुवास, ड्रायफ्रूट्सचा समृद्ध स्वाद आणि केकची मऊ, ओलसर टेक्स्चर हे सर्व मिळून हा केक खरोखरच उत्सवाला खास स्पर्श देतो. परंपरेनुसार प्लम केक काही दिवस आधीच बनवला जातो, ज्यात ड्रायफ्रूट्सला रम किंवा ज्यूसमध्ये भिजवून ठेवले जाते, ज्यामुळे त्याचा सुगंध आणि स्वाद अधिक चांगला होतो. आजकाल अनेक जण अल्कोहोल न वापरता हा केक बनवतात आणि तो तितकाच स्वादिष्ट तयार होतो. ख्रिसमस ट्रीची सजावट, घरातील दिव्यांची रोषणाई आणि प्लम केकचा सुगंध… हीच ख्रिसमसची खरी जादू! चला तर मग, ही पारंपरिक पण सोपी ख्रिसमस स्पेशल प्लम केक रेसिपी जाणून घेऊया.

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतील प्रथिनेयुक्त मूगडाळीचे लाडू; पारंपरीक रेसिपीने शरीर होईल बळकट, आजच बनवा रेसिपी

साहित्य :

  • मनुका – ½ कप
  • काळा मनुका– ¼ कप
  • ड्राय क्रॅनबेरी – ¼ कप
  • चिरलेली अंजीर – ¼ कप
  • चिरलेले खजूर – ¼ कप
  • मैदा – 1½ कप
  • साखर – ¾ कप (कॅरामेल बनवण्यासाठी)
  • बटर – ½ कप
  • अंडी – 3
  • बेकिंग पावडर – 1 टीस्पून
  • बेकिंग सोडा – ¼ टीस्पून
  • दालचिनी पावडर – ½ टीस्पून
  • जायफळ पावडर – ¼ टीस्पून
  • लवंग पावडर – ¼ टीस्पून
  • व्हॅनिला इसेन्स – 1 टीस्पून
  • संत्र्याचा ज्यूस – 1 कप
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • बदाम/काजू – ¼ कप चिरलेले
  • पाणी – 2-3 टेबलस्पून
शिल्लक राहिलेला भात फेकून देत असाल तर थांबा! नाश्त्यासाठी झटपट बनवा मऊ जाळीदार उत्तप्पा, छोट्या भुकेसाठी उत्तम पदार्थ

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम सर्व ड्रायफ्रूट्स एका बाउलमध्ये घ्या. त्यावर संत्र्याचा ज्यूस आणि लिंबाचा रस टाकून रात्रीभर भिजू द्या. याने केकचा स्वाद जबरदस्त वाढतो.
  • कढईत साखर टाका आणि हलक्या आचेवर वितळू द्या. ते गडद तपकिरी झाल्यावर त्यात 2-3 टेबलस्पून पाणी टाका. छान सिरप बनवा आणि थंड होऊ द्या.
  • एका बाउलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर , लवंग पावडर आणि जायफळ पावडर चाळून घ्या.
  • बटर मऊ करून त्यात तयार केलेला कॅरामेल सिरप आणि अंडी घालून छान फेटून घ्या. त्यात व्हॅनिला इसेन्स घाला.
  • ओलसर मिश्रणात हळूहळू मैद्याचे मिश्रण मिसळा. नंतर भिजवलेले ड्रायफ्रूट्स (ज्यूससह) आणि चिरलेले बदाम/काजू घालून एकसारखे मिसळा.
  • केक टिनला बटर लावून मैदा भुरा लावा. मिश्रण त्यात ओता आणि 160°C वर 45–55 मिनिटे बेक करा. मध्ये
  • टूथपिक घालून तपासा, ती स्वच्छ बाहेर आली तर केक तयार.
  • केक पूर्ण थंड होऊ द्या. तो जितका वेळ तो ठेवला जाईल तितका अधिक चविष्ट होतो.
  • ख्रिसमस पार्टीमध्ये तुम्ही या केकला गरमा गरम चहा किंवा कॉफीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Christmas 2025 know how to make plum cake at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Christmas
  • easy food recipes
  • sweet dish

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.