तेलाने काळीकुट्ट-चिकट झालेली कढई एका मिनिटांतच होईल नव्यासारखी चकचकीत; पैसेही खर्च कारण्याची गरज नाही, घरगुती टिप्सचा करा वापर
आपल्या स्वयंपाकघरात अनेक अशी भांडी आहेत ज्यांचा दररोज जेवण बनवण्यात वापर केला जातो. सततच्या वापरामुळे अनेकदा ही भांडी खराब होऊ लागतात आणि यांच्यावर तेलाचा चिकट थर बसू लागतो. यातीलच एक म्हणजे घरात वापरली जाणारी कढई… बहुतेक सर्वांच्याच घरात जेवण बनवण्यासाठी कढईचा वापर केला जातो. तेल आणि मसाल्यांमुळे भांड्यांवर अनेकदा ग्रीस जमा होऊ लागते. आपण जर हे वेळीच नीट घासले नाही तर याचा थर आणखीन चिकट आणि मजबूत होऊ लागतो ज्यांनंतर याला दूर करणे कठीण होऊन बसते. अशात आज आम्ही तुम्हाला काही घरगुती टिप्सच्या मदतीने काळी-चिकट झालेली भांडी सोप्या पद्धतीने घरीच स्वछ कशी करायची याची एक सोपी ट्रिक सांगत आहोत. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही तर घरगुती पदार्थांचा वापर करूनच आपण भांड्यांना नवी चकाकी देऊ शकतो. चला या ट्रिकविषयी सविस्तर जाणून घेऊया.
बेकिंग सोडा
जळलेले पदार्थ, काळे डाग आणि ग्रीस काढण्यासाठी बेकिंग सोडा प्रभावी उपाय मानला जातो. यामध्ये असलेले घटक भांड्यांवर जमा झालेली सर्व घाण काढून मदत करतात. यासाठी प्रथम कढई पूर्णपणे बुडेल इतपत गरम पाणी घ्या आणि यात त्यात २-३ चमचे बेकिंग सोडा घाला. रात्रभर किंवा काही तास बेकिंग सोडा घातलेले हे गरम पाणी कढईत तसेच राहू द्या आणि मग सकाळी साबण आणि स्क्रबने कढईला घासून स्वच्छ करा. तुम्हाला दिसेल की कढईवर चिकटलेले तेलाचे काळे डाग याच्या मदतीने सहज दूर होऊ लागतील आणि कढई नव्यासारखी चकचकीत साफ होईल.
बेकिंग पावडर आणि मीठ
बेकिंग पावडरमध्ये असलेले घटक भांड्यांवर जमा झालेली सर्व घाण काढून टाकू शकतात. कढई स्वच्छ करण्यासाठी, एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काही चमचे बेकिंग पावडर आणि मीठ मिसळून हे पाणी गॅसवर छान उकळवून घ्या. हे मिश्रण उकळल्यानंतर, त्यात कढई बुडवा आणि काही वेळ राहू द्या. नंतर स्क्रब आणि भांड्यांच्या साबणाने कढईला छान स्वछ करा. अशाप्रकारे कढई साफ करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मेहनतीची गरज लागणार नाही आणि अगदी सहज कढईवरील डाग दूर होतील.
मीठ आणि लिंबू
पॅनवरील ग्रीस काढून टाकण्यासाठी स्वयंपाकघरातील मीठ आणि लिंबूचाही वापर करता येईल. यासाठी सर्वप्रथम पॅन किंवा पॅनमधील पाणी काढून टाका. आता गॅस चालू करा आणि या पाण्यात २ चमचे डिटर्जंट, एक चमचा मीठ आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. तुम्हाला हे मिश्रण सुमारे ५ मिनिटे उकळवा. या मिश्रणात असलेले घटक पॅनचा काळेपणा आणि ग्रीस काढून टाकण्यास उपयुक्त ठरू शकतात.
चपाती की भाकरी सगळ्यात जास्त पोषक घटक कशात असतात ?
व्हाईट व्हिनेगर
जर तुम्हाला कढई किंवा तव्यावर साचलेली घाण, ग्रीस आणि काळेपणा काढून भांडी नव्यासारखी बनवायची असेल तर तुम्ही व्हाईट व्हिनेगर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. यासाठी लिंबाचा रस आणि एक कप पांढरा व्हिनेगर पाण्यात मिसळा. आता तुम्हाला कढई किंवा तव्याला या पाण्यात काही वेळ भिजवावे लागेल आणि नंतर स्क्रबने घासून भांडी पूर्णपणे स्वच्छ करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या