चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? तरुण वयातील 'या' चुकांमुळे त्वचा होते खराब
प्रत्येक व्यक्तीला आपण नेहमीच सुंदर दिसावे, असे वाटत असते. सुंदर आणि चारचौघांमध्ये उठावदार दिसण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन ट्रीटमेंट करून त्वचा उजळदार केली जाते, तर कधी वेगवेगळ्या क्रीम किंवा महागडे उत्पादने, फेश वॉशचा वापर त्वचेसाठी केला जातो. पण चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम किंवा इतर समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेची गुणवत्ता अतिशय खराब होऊन जाते. बिघडलेली पचनक्रिया, पाण्याची कमतरता आणि सतत वापरल्या जाणाऱ्या क्रीममुळे त्वचा अधिकच निस्ते आणि कोरडी होऊन जाते. त्वचेमधील तेल आणि ओलावा कमी झाल्यानंतर चेहरा कोरडा होऊन जातो. तरुण वयातच त्वचा अतिशय निस्तेज आणि म्हाताऱ्यासारखी वाटू लागते. दैनंदिन आयुष्य जगताना केलेल्या चुकांमुळे कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा निस्तेज दिसणे, त्वचा रंग बदलणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)
केसांच्या समस्यांपासून मिळवा कायमचा आराम! घनदाट केसांसाठी ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर
सतत धूळ, माती, प्रदूषण आणि वातावरणातील बदलांमुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर महिला सतत काहींना काही उपाय करतात. मात्र तरीसुद्धा त्वचा उजळदार आणि तरुण दिसत नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला कोणत्या चुकीच्या सवयीनमुळे त्वचा खराब होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सवयी वेळीच बदलून चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.
त्वचा कायम तरुण आणि हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात,ज्यामुळे शरीर स्वच्छ राहते. दिवसभरात कमी पाणी प्यायल्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊन जाते. शरीर डिहाडयड्रेट झाल्यामुळे त्वचा कोरडी किंवा ओढल्यासारखी दिसू लागते. त्यामुळे दिवसभरात ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कायमच बाहेरील जंक फूड, तिखट तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण या पदार्थांच्या अतिसेवनामुळे पचनक्रिया बिघडते आणि चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले मुरूम, पिंपल्स काही केल्या लवकर निघून जात नाहीत. त्यामुळे हेल्दी आणि आरोग्यदायी पदार्थांचे नियमित सेवन करावे. आहारात अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन सी युक्त पदार्थ खावेत.
कायम निरोगी आणि हेल्दी आरोग्यासाठी शांत झोप घेणे आवश्यक आहे. शांत झोप घेतल्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे किंवा कामाच्या तणावामुळे पुरेशी झोप मिळत नाही. पण या सगळ्यातून वेळ काढत शांत झोप घेणे आवश्यक आहे. नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घ्यावी.