त्वचेच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल नारळाचे दूध!
त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला बाजारातील महागडे स्किन केअर प्रॉडक्ट, क्रीम किंवा इतर अनेक गोष्टींचा वापर करतात. मात्र स्किन केअर प्रॉडक्टच्या वापरामुळे बऱ्याचदा त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. वाढलेले वय, मासिक पाळी, आहारात होणारे बदल, अपचन किंवा बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे त्वचेवर पिंपल्स येण्याची जास्त शक्यता असते. पिंपल्स किंवा मुरूम आल्यानंतर त्वचा अधिकच निस्तेज आणि रुक्ष होऊन जाते. अशावेळी अनेक महिला फेशिअल किंवा वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. अशावेळी त्वचेवर नैसर्गिक व कायम टिकणारे ग्लो मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या दुधाचा वापर करावा. खोबऱ्याचे दूध त्वचा आतून मऊ आणि चमकदार करण्यास मदत करते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचेसाठी खोबऱ्याचे दूध त्वचेवर कसे लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
स्वयंपाक घरातील ‘हे’ बारीक दाणे त्वचा करतील काचेसारखी सुंदर, मुरुम-पिग्मेंटेशनच्या समस्या होतील दूर
नारळाच्या दुधाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय हे दूध उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. यामुळे त्वचा अधिकच मऊ आणि मुलायम होते. कोरडी झालेली त्वचा कायम हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी नारळाच्या दुधाचा वापर करावा. रात्री झोपण्याआधी वाटीमध्ये नारळाचे दूध घेऊन बोटांच्या सहाय्याने त्वचा आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. हे दूध तुम्ही रात्रभर त्वचेवर तसेच ठेवू शकता किंवा १५ मिनिटांनंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास त्वचा अतिशय मुलायम आणि सॉफ्ट होईल.
कामानिमित्त बाहेर जाताना मेकअप केल्यानंतर तो काढण्यासाठी मेकअप रिमूव्हरचा वापर केला जातो. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे मेकअप रिमूव्हर आणि क्लिंझर उपलब्ध आहेत. पण हानिकारक रसायनांपासून बनवलेले क्लिंझर वापरण्याऐवजी तुम्ही नारळाच्या दुधाचा वापर करू शकता. नारळाचे दूध त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. मेकअप काढण्यासाठी हातांवर नारळाचे दूध घेऊन संपूर्ण त्वचेवर हलक्या हाताने चोळून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्वचा स्वच्छ करा आणि वरून फेसवॉश वापरून त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्यावी. यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर ड्रायनेस जाणवणार नाही.
फेसमास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये नारळाचे दूध घेऊन त्यात मध आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण १० ते १५ मिनिटं त्वचेवर लावून ठेवा. त्यानंतर काहीवेळाने त्वचा हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेली टॅनिंग, डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय केल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल.