जेवणानंतर घशात वाढलेल्या पित्तामुळे सतत आंबट ढेकर येतात? 'या' सवयी बदलून तात्काळ मिळवा आराम
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. आहारात तिखट तेलकट पदार्थांचे सेवन, अपुरी झोप आणि सतत जागरण केल्यामुळे शरीराची पचनक्रिया अतिशय कमकुवत होऊन जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर वारंवार ऍसिडिटी होणे, आंबट ढेकर येणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अन्ननलिकेमध्ये पित्त जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर घशात जळजळ होणे किंवा अस्वस्थ वाटू लागते. त्यामुळे आहारात कायमच हलक्या आणि सहज पचन होतील अशा पदार्थांचे सेवन करावे. दैनंदिन आहारात पालेभाज्या, फळे किंवा कमी तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.(फोटो सौजन्य –pinterest)
आपल्यातील अनेकांना वारंवार पित्त होणे किंवा ऍसिडिटी होत असते. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. अन्ननलिकेमध्ये पित्ताचे प्रमाण वाढू लागल्यानंतर छातीमध्ये जळजळ वाढते. खाल्ले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जठरात आम्ल तयार होते, ज्याचे प्रमाण वाढल्यानंतर ते अन्ननलिकेमधून उलट्या दिशेने जाते. अन्नपदार्थ उलट्या दिशेने गेल्यामुळे छातीमध्ये सतत जळजळ होते. याला ‘ऍसिड रिफ्लेक्स’ असे म्हणतात. अनेक लोक रात्री किंवा दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपून जातात. अन्नपदार्थ खाल्यानंतर लगेच झोपल्यामुळे अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. त्यामुळे आहारात प्रामुख्याने तळलेले, मसालेदार, फास्टफूड किंवा कोणत्याही आवडत्या पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन करू नये. यामुळे शरीराला अन्नपदार्थ पचन करताना अनेक अडथळे निर्माण होतात.
जेवल्यानंतर शारीरिक हालचाली करणे अतिशय महत्वाचे आहे. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे किंवा आडवे झाल्यामुळे अन्न आणि आम्ल पुन्हा एकदा वरती येते. हे आम्ल वाढल्यानंतर सतत आंबट ढेकर येणे किंवा उलट्या, मळमळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अन्ननलिकेमधील स्नायूंवर दबाव आल्यामुळे सतत ढेकर येऊ लागतात. त्यामुळे जेवणानंतर लगेच झोपण्याची घाई करू नये. ही अतिशय चुकीची सवय आहे. याशिवाय खाल्ले अन्नपदार्थ एक घास ३२ वेळा चावून खावा.
ऍसिडिटी टाळण्यासाठी काय करावे?
जंक फूड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा.नियमित आणि संतुलित आहार घ्या.वेळेवर जेवण करा.जास्त प्रमाणात चहा, कॉफी आणि अल्कोहोल पिणे टाळा.तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.
ऍसिडिटीसाठी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर घरगुती उपायांनी आराम मिळत नसेल, जर ऍसिडिटीमुळे खूप त्रास होत असेल, जर ऍसिडिटीमुळे वजन कमी होत असेल, जर ऍसिडिटीमुळे रक्तस्त्राव होत असेल, जर ऍसिडिटीमुळे गिळायला त्रास होत असेल.
ऍसिडिटी म्हणजे काय?
ऍसिडिटी म्हणजे तुमच्या पोटात ऍसिडची पातळी वाढणे. यामुळे छातीत जळजळ, अपचन, आणि आंबट ढेकर येणे अशा समस्या उद्भवू शकतात.