पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयानक लक्षणे
वयाच्या आठव्या- नवव्या वर्षी मुलींना मासिक पाळी का येते? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे
पोटाला सूज आल्यानंतर पोटाच्या आकारात अनेक बदल होऊ लागतात. गॅस, अपचन किंवा ऍसिडिटी समजून अनेक लोक दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे पोटामध्ये जास्तीचा वायू साचून राहतो. तसेच अनेकदा विषारी घटक शरीरात साचून राहण्याची जास्त शक्यता असते. पोटासंबंधित आजारांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
पोटाला सूज आलेल्या रुग्णांना शौचास त्रास होण्याची जास्त शक्यता असते. अनेक लोक बद्धकोष्ठता किंवा जुलाब समजून दुर्लक्ष करतात. त्यामुळे आरोग्यासंबंधित ही समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल झाल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये.
बऱ्याचदा थोडस खाल्ल्यानंतर अनेकांना पोट भरल्यासारखे वाटू लागते. पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येणारे प्रमुख लक्षण म्हणजे थोडस खाल्ल्यानंतर लगेच पोट भरल्यासारखे वाटणे. पोटात वारंवार जडपणा जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. ओटीपोटात वाढलेल्या वेदनांकडे महिला कधीच लक्ष देत नाही. पण योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाला अस्वस्थ वाटू लागते.
अंघोळ करताना थंड की गरम पाणी वापरावे? जाणून घ्या शरीरासाठी कोणते पाणी आहे जास्त प्रभावी
पोट फुगणे म्हणजे काय?
पोट फुगणे म्हणजे पोटातील गॅस किंवा द्रवपदार्थ साठल्यामुळे पोटात अस्वस्थता किंवा मोठेपणा जाणवणे. हे साधारणतः तात्पुरते आणि निरुपद्रवी असू शकते, पण काहीवेळा ते एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.
पोट फुगणे कमी करण्यासाठी काय करावे?
कमी गॅस तयार करणारे पदार्थ खा. पुरेसे पाणी प्या. नियमित व्यायाम करा.गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटाला सूज आल्यास काय करावे?
जर सूज जास्त दिवस टिकून राहिली किंवा तीव्र वेदना होत असतील, तर डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.






