
छातीत वाढलेल्या जळजळमुळे सतत आंबट ढेकर येतात? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आराम
आपल्यातील अनेकांना वारंवार ॲसिडीटी किंवा अपचनाची समस्या उद्भवते. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. छातीमध्ये जळजळ होणे, वेदना, उलट्या, मळमळ, आंबट ढेकर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवून शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. याशिवाय काहीवेळा बद्धकोष्ठतेमुळे डोकेदुखीचा त्रास जाणवतो. शरीरात वाढलेली ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण असे न करता घरगुती उपाय करून आराम मिळवावा.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. यामुळे अन्ननलिकेमध्ये आम्ल्पित्त तयार होऊन शरीराला त्रास होतो. शरीरात वाढलेल्या उष्णतेचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास शरीराची पचनक्रिया कायमच मजबूत आणि निरोगी राहील. याशिवाय संबद्धकोष्ठतेमुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील.
शरीरात वाढलेली ॲसिडीटी नियंत्रणात ठेवण्यासाठी कच्चा पपई आणि कोरफडच्या रसाचे एकत्र सेवन करावे. या दोन्ही पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोरफडचा रस गुणकारी ठरेल.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना आल्याचा वापर केला जातो. आल्यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरातील दाह कमी करून आरोग्य सुधारतात. याशिवाय आल्यामध्ये असलेले बायोॲक्टीव्ह घटक शरीराची पचनक्रिया सुधारून ऍसिडिटी नियंत्रणात ठेवतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याचा रस किंवा आल्याचे पाणी प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेला कचरा बाहेर पडून जाईल आणि शरीराला अनेक फायदे होतात. शरीराच्या अंतर्गत अवयवाला आलेली सूज कमी करण्यासाठी आल्याचा रस प्यावा.
सकाळी उठल्यानंतर बदामाचं दूध किंवा फुल फॅट दूध प्यायल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होऊन ऍसिडिटी नियंत्रणात राहील. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात तुम्ही ओट्स मिल्क सुद्धा पिऊ शकता. यामुळे आतड्यांचे कार्य सुलभ राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.
Uric Acid च्या रुग्णांनी टाळा 3 भाज्यांचे सेवन, संधिवाताने व्हाल हैराण
काहींना सकाळच्या नाश्त्यात नियमित २ केळी खाण्याची सवय असते. केळी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतील असे नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन पदार्थांचे सेवन करावे.
ऍसिडिटी म्हणजे काय?
ऍसिडिटी, ज्याला ऍसिड रिफ्लक्स किंवा पित्त म्हणतात, ही एक पचनाची समस्या आहे जिथे पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत जाते, ज्यामुळे छातीत आणि घशात जळजळ होते.
ऍसिडिटीची सामान्य लक्षणे कोणती आहेत?
छातीत आणि पोटात जळजळ होणे.अस्वस्थता, मळमळ आणि ढेकर येणे.तोंडात आंबट चव येणे.पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा गॅस होणे.
ऍसिडिटीसाठी कोणता आहार टाळावा?
ऍसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी मसालेदार, तेलकट पदार्थ, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे आणि चॉकलेट्स टाळणे चांगले.चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित करा.