Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Health: सतत तणावाखाली राहिल्यामुळे पोट वाढते,कसे कमी कराल? जाणून घ्या

Women Health: सततचा ताण, अपुरी झोप आणि जीवनशैलीतील बदल यांचा शरीराच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही वेळा कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनशी संबंधित बदलांमुळे पोटाभोवती चरबी वाढण्याची शक्यता असते. यालाच सामान्यतः ‘कोर्टिसोल बेली फॅट’ म्हटले जाते. जाणून घ्या, कोर्टिसोल बेली फॅट म्हणजे काय, त्यामागील संभाव्य कारणे कोणती आणि संतुलित

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 20, 2026 | 05:14 PM
Constant stress leads to an increase in belly fat—how can you reduce it?(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Constant stress leads to an increase in belly fat—how can you reduce it?(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कोर्टिसोल बेली फॅट म्हणजे नक्की  काय?
  • स्टिरॉइडचा वापर कोर्टिसोल वाढवू शकतो.
  • नियमित व्यायाम , पौष्टिक आहार ,पुरेशी झोप आणि व्यावसायिक मदत
आजकालच्या धावपळीच्या जगात महिला देखील घर-कुटुंब सांभाळून पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करतात. अशात त्यांची रोज तारेवरची कसरत असते, घर, कुटुंब, मुलं की नोकरी हे सगळं सांभाळण्यात काही महिला तारांबळ उडते, ज्यामुळे बऱ्याच महिला तणावाखाली येतात ज्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागते, ज्याचा परिणाम हा त्यांच्या शरीरावर होताना दिसतो. एका सर्वेक्षणात असं समोर आलंय की, जर महिला सतत तणावाखाली असतील तर त्यांच्या पोटाची चरबी वाढू लागते आणि हार्मोनल बद्दल ह्यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते.याची नेमकी काय कारणं आहेत? जाणून घ्या.(Women Health)

कशामुळे पोटावर चरबी वाढू लागते?

एका सर्वेक्षणातील माहितीनुसार, पोटाची चरबी वाढण्यास अनेक घटक कारणीभूत असतात. खाण्याच्या वाईट सवयींव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आहे, ज्यामुळे पोटाची चरबी वाढते. तणावाच्या वेळी महिलांच्या शरीरात कॉर्टिसोल हा हार्मोन सोडला जातो. कोर्टिसोलची उच्च पातळी आणि कमी पातळी दोन्ही अनेक आरोग्य समस्यांना जन्म देतात. कोर्टिसोलच्या उच्च पातळीमुळे पोटावर चरबी जमा होऊ लागते. जर तुम्ही सतत तणावाखाली असाल तर कोर्टिसोलमुळे पोटाची चरबी कमी करणे कठीण होते

office culture: गैरसमजामुळे बॉसने तुमच्याबद्दल नकारात्मक मत बनवले आहे? प्रतिमा सुधारण्यासाठी वापरा हे ५ मार्ग

कोर्टिसोल बेली फॅट म्हणजे नक्की  काय?

एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार बंगळुरूच्या वरिष्ठ मानसशास्त्रज्ञ नेहा कडबम म्हणतात, ‘कॉर्टिसॉल बेली फॅटला स्ट्रेस बेली’ असेही म्हणतात. सततच्या उच्च पातळीच्या तणावामुळे शरीराच्या मध्यभागी चरबी जमा होते. ही स्थिती मुख्यतः कॉर्टिसॉल हार्मोनच्या वाढीमुळे उद्भवते, जे तणावाच्या काळात अधिवृक्क ग्रंथींमधून स्रावित होते.

स्टिरॉइडचा वापर कोर्टिसोल वाढवू शकतो.

कोर्टिसोलच्या उच्च पातळीच्या सतत संपर्कामुळे पोटावर चरबी जमा होते. कॉर्टिसॉल शरीराला ताणतणावांना प्रतिसाद देते, रक्तदाब, रक्तातील साखर आणि चयापचय नियंत्रित करण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते. तणाव, स्टिरॉइडचा वापर आणि ट्यूमर देखील कोर्टिसोलची पातळी वाढवू शकतात. काही लोकांसाठी, कोर्टिसोलच्या उच्च पातळीमुळे जास्त खाणे आणि त्यानंतरचे वजन वाढू शकते. उच्च कोर्टिसोल पातळी व्यवस्थापित करणे महत्वाचे आहे.त्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढत जातो.

Relationship Tips: तुम्हालाही प्रेम व्यक्त करता येत नाहीये का? ‘या’ पाच मार्गांचा अवलंब करा

नियमित व्यायाम व पौष्टिक आहार करणे .

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम. विशेषतः वेगाने चालणे, धावणे किंवा पोहणे यासारख्या एरोबिक साधन करणे सुरू करा. हे तणाव कमी करण्यात आणि कोर्टिसोल पातळी सामान्य करण्यात मदत करू शकतात.ताजी फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करा. याच्या मदतीने कोर्टिसोलचे परिणाम कमी करता येतात. साधे कार्बोहायड्रेट्स पोटाची चरबी वाढवतात. साखर आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणे देखील महत्त्वाचे आहे. फ्रुक्टोजयुक्त पेय टाळा.

पुरेशी झोप आणि  मदत डॉक्टरांची

डॉक्टरांच्या मते, ‘चांगली झोप घेतल्याने शरीराला तणावातून सावरण्यास आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. प्रत्येक रात्री 7-9 तासांची झोप महत्वाची ठरते .तुम्हाला ताण आणि वजन व्यवस्थापित करण्यात अडचण येत असल्यास,डॉक्टरांची भेट घ्या . उपचार न केल्यास, कोर्टिसोल बेली फॅटमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, पाय आणि फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या यासारख्या गंभीर आरोग्य समस्या आढळू शकतात.  नैराश्य आणि मूड स्विंगसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोर्टिसोल हार्मोन शरीरात कोणते कार्य करतो?

    Ans: कोर्टिसोल हा अधिवृक्क ग्रंथींमधून स्रवणारा हार्मोन आहे. तो शरीराला तणावाचा सामना करण्यास मदत करतो. तसेच रक्तातील साखर, रक्तदाब, चयापचय आणि दाह नियंत्रित करण्यात त्याची भूमिका असते.

  • Que: तणावामुळे पोटावर चरबी वाढू शकते का?

    Ans: होय, दीर्घकाळचा तणाव वजन वाढण्यास हातभार लावू शकतो. तणावामुळे झोपेवर, भुकेवर आणि खाण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. कोर्टिसोलमधील बदलांचाही यात सहभाग असू शकतो.

  • Que: कोर्टिसोल बेली फॅट कमी करण्यासाठी किती तास झोप घ्यावी?

    Ans: बहुतेक प्रौढ व्यक्तींनी दररोज साधारण ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करावा. नियमित झोपेची वेळ आणि पुरेशी विश्रांती तणावाचे व्यवस्थापन आणि निरोगी वजन राखण्यास मदत करू शकतात.

Web Title: Constant stress leads to an increase in belly fat how can you reduce it sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • weight gain
  • women health

संबंधित बातम्या

Epilepsy: एपिलेप्सीवर मात करणे शक्य! फक्त फिट्स थांबवण्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक उपचार देत आहेत रुग्णांना नवे आयुष्य
1

Epilepsy: एपिलेप्सीवर मात करणे शक्य! फक्त फिट्स थांबवण्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक उपचार देत आहेत रुग्णांना नवे आयुष्य

Mental Health: अपुरी झोप, तणाव आणि बैठ्या जीवनशैलीचा पुरुषांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
2

Mental Health: अपुरी झोप, तणाव आणि बैठ्या जीवनशैलीचा पुरुषांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Respiratory Health: तरुणांमध्ये वाढता COPD चा धोका, गर्भावस्थेतील श्वसनविषयक समस्या आणि पर्यावरणीय व जीवनशैलीशी संबंधित जोखीम घटक
3

Respiratory Health: तरुणांमध्ये वाढता COPD चा धोका, गर्भावस्थेतील श्वसनविषयक समस्या आणि पर्यावरणीय व जीवनशैलीशी संबंधित जोखीम घटक

Diabetes In Men: रक्तातील साखरेपलीकडे! मधुमेहाचा पुरुषांच्या लैंगिक, हार्मोनल आणि हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम
4

Diabetes In Men: रक्तातील साखरेपलीकडे! मधुमेहाचा पुरुषांच्या लैंगिक, हार्मोनल आणि हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.