त्वचा तरुण दिसण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
कामाच्या धावपळीमुळे आणि दैनंदिन आयुष्यातील जबाबदाऱ्यांमुळे अनेकदा महिलांना स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. वयाच्या तिशीनंतर खऱ्या आयुष्याला सुरुवात होते. नोकरी, लग्न, मुलं या नव्या आयुष्याला सुरुवात झाल्यानंतर सतत येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे काहीवेळा महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यासोबत त्वचेमध्ये सुद्धा अनेक गंभीर परिणाम दिसून येतात.(फोटो सौजन्य – iStock)
आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ रसाचे सेवन
वय वाढल्यानंतर त्वचेमध्ये बदल होण्यास सुरुवात होते. पिंपल्स येणे, वजन वाढणे, शरीरात होणारे हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, थकवा, कमजोरी, सुरकुत्या इत्यादींमुळे त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वयाच्या तिशीमध्ये तरुण दिसण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
रोजच्या आहारात सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये अक्रोडाचे सेवन करावे. अक्रोड खाल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. याशिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, अॅंटीऑक्सिडेंट्स आणि विटामिन ई इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. त्वचा कायम तरुण आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमित २ ते ३ अक्रोडचे सेवन करावे. अक्रोड खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
हिरव्या पालेभाज्या लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खायला आवडत नाही. मात्र या भाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम आणि विटामिन आढळून येते. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. यामध्ये तुम्ही पालक, मेथी, मुळा इत्यादी भाज्यांचे सेवन करू शकता. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न, फोलिक अॅसिड आणि विटामिन के भरपूर प्रमाणात आढळून येते.
त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी आहारामध्ये बेरीजचे सेवन करावे. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी इत्यादी बेरीजच्या सेवनामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. बेरिजमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटीऑक्सिडेंट्स आढळून येते, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा कायम फ्रेश, चमकदार दिसू लागते.
ग्रीक योगर्ट शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. रोजच्या आहारात ग्रीक योगर्टचे सेवन केल्यास त्वचेवरील चमक वाढून त्वचा कायम फ्रेश आणि ग्लोइंग दिसेल. याशिवाय ग्रीक योगर्ट खाल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हाडं आणि मांसपेशी मजबूत राहण्यासाठी आहारात ग्रीक योगर्टचे सेवन करावे.