आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' रसाचे सेवन
दैनंदिन आहारात कोरफडीचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आहारात सतत होणारे बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात कोरफडीच्या रसाचे सेवन करावे. कोरफडचा रस त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. कोरफडचा रस प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि एंजाइम इत्यादी अनेक घटक आढळून येतात.(फोटो सौजन्य – iStock)
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोरफडच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. याशिवाय कोरफडच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे आतड्यांमधील घाण स्वच्छ होऊन आतड्या निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरफडचा रस प्याल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित कोरफडचा रस प्यायल्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतील. यासाठी कोमट पाण्यात कोरफडचा रस टाकून नियमित सेवन करा. यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारेल. यासोबतच शरीरात साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातील, शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. त्वचा आणि केसांच्या निरोगी आरोग्यासाठी नियमित कोरफडच्या रसाचे सेवन करावे.
कोरफडचा रस त्वचा हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित कोरफडच्या रसाचे सेवन करावे. यामुळे केसांनासुद्धा अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेवरील सुरकुत्या कमी करून त्वचेमधील तारुण्य कायम टिकवून ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कोरफडचा रस केसांना लावून हलक्या हाताने मसाज केल्यास टाळूवरील इन्फेक्शनचा धोका कमी होऊन टाळूवरील त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होईल.
हातापायांमध्ये सतत वेदना होतात? मग वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन
कोरफडच्या रसात अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे रोगांपासून शरीराचा बचाव होतो. साथीच्या आजारांपासून सुटका मिळ्वण्यासाठी नियमित उपाशी पोटी कोरफडच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्ससोबत लढण्यासाठी मदत करतात. याशिवाय हानिकारक पेशींपासून शरीराचे नुकसान होत नाही. रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी नियमित कोरफडच्या रसाचे सेवन करावे.