रक्तात साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
शरीरात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे रक्त. निरोगी राहण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात रक्त असणे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा शरीरात वारंवार थकवा जाणवणे, अशक्तपणा, त्वचेचा रंग बदलणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात लोहयुक्त पदार्थांचे भरपूर सेवन करणे आवश्यक आहे. शरीरात केवळ रक्ताची कमतरताच नाहीतर विषारी घटक सुद्धा साचून राहतात. रक्तात साचून राहिलेले विषारी घटक हळूहळू संपूर्ण शरीरात पसरतात, ज्यामुळे आरोग्य बिघडू लागते. विषारी तत्वांची वाढ झाल्यामुळे वारंवार धाप लागणे किंवा थकवा वाढण्याची शक्यता असते. रक्तात साचलेले विषारी घटक हळूहळू शरीरातील अवयव निकामी करून टाकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात सतत बटाटा किंवा पनीरच्या भाजीचे सेवन केले जाते. मात्र या भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीरात टॉक्सिन वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरात विषारी घटक वाढू लागल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. नेहमीच या भाज्यांचे सेवन केल्यामुळे पालेभाज्या किंवा फळभाज्यांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रोजच्या आहारात पालेभाज्या आणि फळ भाज्यांचे सेवन करावे.
रक्तातील घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात पालेभाज्या खाव्यात. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये विटामिन, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे रक्तशुद्ध करण्यासाठी आहारात नियमित पालेभाज्यांचे सेवन करावे. शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी पालक, मेथी आणि शेवग्याच्या शेंगा इत्यादी भाज्या तुम्ही खाऊ शकता. तसेच या भाज्यांचा वापर करून तुम्ही सूप, भाजी, पराठा किंवा कोशिंबीर इत्यादी पदार्थ बनवून खाऊ शकता.
99% पुरुषांना माहीत नाही Private Part स्वच्छ करण्याची पद्धत, तज्ज्ञांकडून जाणून घ्या हायजीनची गोष्ट
शरीरात निर्माण झालेल्या रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होण्याची जास्त शक्यता असते. रक्तात साचलेली अनावश्यक घाण, वारंवार वाढलेली जळजळ शरीरास हानी पोहचवतात. त्यामुळे आहारात पालेभाज्या किंवा फळांचे सेवन केल्यास त्वचेवर चमक येते, रक्त वाढते आणि शरीरात वाढलेला थकवा कमी होण्यास मदत होते.
रक्त शुद्ध करण्यासाठी काय खावे?
रक्त शुद्ध करण्यासाठी आहारात गूळ, बीटरूट, हळद, तुळशी, कडुलिंबाच्या पानांचे सेवन करावे.
रक्ताचे प्रकार काय आहेत?
रक्ताचे मुख्य प्रकार ABO प्रणालीनुसार A, B, AB आणि O असे आहेत. प्रत्येक प्रकारात positive (+) किंवा negative (-) Rh घटक असू शकतो. उदाहरणार्थ, A+, A-, B+, B-, AB+, AB-, O+ आणि O- असे एकूण ८ रक्तगट आहेत.
रक्ताचा प्रकार कसा ठरतो?
तुमचा रक्तगट तुमच्या पालकांकडून मिळालेल्या जनुकांमधून ठरतो, Cleveland Clinic नुसार.