Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन, २ दिवसांमध्ये खोकला होईल कमी

कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. घरगुती पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सकाळी उठल्यानंतर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास आराम मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 06, 2024 | 01:20 PM
कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन

कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात सगळीकडे दिवाळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात पार पडला. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात.फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटत नाही. पण दिवाळीमध्ये फोडले जाणारे हेच फटाके आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. फटाक्यांच्या धुरामुळे आणि फटाक्यांच्या आवाजामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. प्रदूषण वाढल्यामुळे हवेची गुणवत्ता पूर्णपणे खराब झाली आहे. वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक गंभीर समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

हे देखील वाचा: घरच्या घरी पपई लावण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या

दिवाळीमध्ये फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे अनेकांना सर्दी, खोकला, अस्थमा, श्वसनाचे आजार आणि इतर आजारांची लागण झाली आहे. सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर सतत खोकून छातीमध्ये आणि डोकं दुखण्यास सुरुवात होते. शिवाय कोरडा खोकला लवकर बरा होत नाही. कोरडा खोकला झाल्यानंतर रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात खोकला येण्यास सुरुवात होते.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन:

  • घसा खवखवण्यास सुरुवात झाल्यानंतर गरम पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करा. त्यानंतर त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. हा उपाय 4 ते 5 दिवस सतत केल्यास खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होईल. यामुळे कोरडा खोकला कमी होऊन आराम मिळेल. मिठाच्या पाण्यामुळे तोंडातील खराब बॅक्टरीया निघून जाण्यास मदत होईल.
  • वाटीमध्ये एक चमचा ज्येष्ठमध पावडर घेऊन त्यात मध टाकून मिक्स करा. चाटण तयार झाल्यानंतर सेवन करून गरम पाणी प्यावे. यामुळे घशातील वेदनांपासून आराम मिळेल.
  • कोरडा खोकला कमी होत नसल्यास एक ते दोन दिवस नियमित आवळा पावडरचे पाणी प्यावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे खोकला कमी होऊन आराम मिळेल. घशात होणाऱ्या वेदना थांबून जळजळ कमी होईल.
  • गरम पाण्यात मेथी दाणे उकळवून त्याचे पाणी प्यावे. यामुळे तुमचा घसा स्वच्छ होईल आणि खोकल्यापासून आराम मिळेल.घसा खवखवणे, खोकला, कफ इत्यादी समस्यांवर मेथी दाणे प्रभावी आहेत.
हे देखील वाचा: किडनी निकामी झाल्यास चेहऱ्यावर दिसतात ही 4 लक्षणं
  • खोकला कमी करण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टोपात घेऊन त्यात दालचिनी टाकून काहीवेळ उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड करा. हे पाणी प्यायल्यास घशाच्या वेदनांपासून आराम मिळेल.
  • तुळशीचे पाणी किंवा तुळशीचे पान खाल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. तुळशीच्या पानाचा रस बनवताना तुम्ही त्यात आल्याचा तुकडा आणि मध टाकू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume these foods to get relief from dry cough home remedies for cough

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 01:20 PM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

वारंवार लघवीला होते? पाणी न पिताही सतत लघवीला होत असेल तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे
1

वारंवार लघवीला होते? पाणी न पिताही सतत लघवीला होत असेल तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे

योग्य पद्धतीने हात धुतल्यास संसर्गाचा धोका ५०% पर्यंत होऊ शकतो कमी! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

योग्य पद्धतीने हात धुतल्यास संसर्गाचा धोका ५०% पर्यंत होऊ शकतो कमी! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

उपाशी पोटी चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये अल्सर होऊन उद्भवेल ॲसिडिटी- गॅसची समस्या
3

उपाशी पोटी चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये अल्सर होऊन उद्भवेल ॲसिडिटी- गॅसची समस्या

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या
4

Ayushman Card असूनही आजारांवर मिळत नाहीये मोफत उपचार? ‘या’ सुविधा आहेत योजनेच्या बाहेर; आधीच नियम जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.