Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हातपायांमध्ये वेदना आणि गोळे येतात? मग नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, रात्रीच्या वेळी लागेल शांत झोप

शरीरात निर्माण झालेली मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पौष्टिक लाडूचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 09, 2026 | 05:30 AM
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हातपायांमध्ये वेदना आणि गोळे येतात? मग नियमित खा 'हा' पौष्टिक लाडू

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हातपायांमध्ये वेदना आणि गोळे येतात? मग नियमित खा 'हा' पौष्टिक लाडू

Follow Us
Follow Us:

मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे?
मॅग्नेशियम वाढवण्यासाठी काय खावे?
विटामिनची कमतरता कशामुळे निर्माण होते?

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा पोषक घटकांची कमतरता दिसून येते. निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची समप्रमाणात आवश्यकता असते. विटामिन सी, ए, ई, बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी जीवनस्तवे शरीरासाठी फार महत्वाची असतात. पण दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांमुळे आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे आजारपणात वाढ होते. शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने लक्षणे अधिक तीव्र होतात आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते.(फोटो सौजन्य – istock)

छातीत जळजळ आणि गॅसचा त्रास सतावतोय? स्वयंपाकघरातील ‘या’ ५ पदार्थांनी मिळेल झटपट आराम

शरीरसंबंधित समस्या वाढल्यानंतर वेळीच लक्ष देणे फार आवश्यक आहे. शरीरातील मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यानंतर खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. तसेच हातापायांमध्ये वेदना होणे, सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. बऱ्याचदा शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या गोळ्या आणि सप्लिमेंट्स आणून खाल्ले जातात. यामुळे तात्पुरता परिणाम दिसून येतो पण किडनीवर गंभीर परिणाम होऊन शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी पौष्टिक लाडूची रेसिपी सांगणार आहोत. नियमित एक लाडू खाल्ल्यास पोट भरलेले राहते आणि शरीराला फायदे होतात.

मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे:

  • हाता-पायांचे स्नायू अचानक आखडणे
  • रात्री झोपताना पायात क्रॅम्प्स येणे
  • भूक मंदावणे
  • उलट्या झाल्यासारखे वाटणे
  • मळमळणे
  • सतत चिंता वाटणे
  • वारंवार झोप मोड होणे
  • हृदयाचे ठोके अनियमित
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जातात? वारंवार गाठी जाणे बेतू शकते जीवावर, ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी उपाय

मॅग्नेशियमयुक्त घरगुती लाडू बनवण्याची सोपी कृती:

पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात बदाम, भोपळ्याच्या बीया आणि जवसाच्या बीया लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्याच कढईमध्ये चणे घालून हलकेसे भाजून घ्या. भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि वाटून घ्या. तयार केलेले मिश्रण वाटीमध्ये काढून त्यात कोको पावडर आणि बारीक वाटून घेतलेले खजूर घालून मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात गरम केलेले तूप घाला आणि लाडू वळून घ्या. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक लाडू खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मॅग्नेशियमच्या कमतरतेची प्रमुख लक्षणे कोणती आहेत?

    Ans: हात-पायांना गोळे येणे, स्नायूंमध्ये वेदना, थकवा, अशक्तपणा, झोप न लागणे, डोळ्यांच्या पापण्यांचे फडफडणे आणि चिडचिड ही मॅग्नेशियमच्या कमतरतेची सामान्य लक्षणे असू शकतात.

  • Que: मॅग्नेशियमयुक्त लाडू खाल्ल्याने काय फायदे होतात?

    Ans: मॅग्नेशियमयुक्त घटकांपासून बनवलेले लाडू स्नायूंचे आरोग्य सुधारण्यास, हाडे मजबूत ठेवण्यास, ऊर्जा वाढवण्यास आणि शांत झोपेस मदत करू शकतात.

  • Que: मॅग्नेशियम कोणत्या पदार्थांमध्ये भरपूर असते?

    Ans: भोपळ्याच्या बिया, तीळ, बदाम, काजू, शेंगदाणे, ओट्स, रागी, डार्क चॉकलेट, पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळते.

Web Title: Do you experience pain and cramps in your hands and legs due to magnesium deficiency then regularly eat this nutritious laddu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • important vitamins
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर
2

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे
3

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
4

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.