Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात आहारात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढू शकतो Food Poisoning चा धोका! अन्यथा आजारपण वाढून उद्भवतील पोटाचे विकार

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आजारपणात वाढ होते आणि शरीराला हानी पोहचते. याशिवाय अन्नातून विषबाधा सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 09, 2026 | 08:09 AM
पावसाळ्यात आहारात होणाऱ्या 'या' बदलांमुळे वाढू शकतो Food poisoning चा धोका! अन्यथा आजारपण वाढून उद्भवतील पोटाचे विकार

पावसाळ्यात आहारात होणाऱ्या 'या' बदलांमुळे वाढू शकतो Food poisoning चा धोका! अन्यथा आजारपण वाढून उद्भवतील पोटाचे विकार

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात पोटाचे विकार कशामुळे होतात?
जीवनशैलीतील कोणत्या चुका आजारपण वाढवतात?
पावसाळ्यात कापलेली फळे का खाऊ नयेत?

राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंड वातावरण झाले आहे. यासोबतच आजारांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. वातावरणात वाढलेल्या गारव्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस मोठ्या प्रमाणावर वाढून आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. फूड पॉयझनिंग, टायफॉईड, पोटासंबंधित विकार, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांमध्ये वाढ झाली आहे. साथीच्या किंवा संसर्गजन्य आजारांची शरीराला लागण झाल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. पावसाळ्यात आजारपणात वाढ झाल्यामुळे अनेक लोक सतत आजारी पडतात. पाऊस पडल्यानंतर सगळीकडे थंडावा निर्माण होतो पण शरीरास हानिकारक असलेले विषाणू झपाट्याने वाढू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हातपायांमध्ये वेदना आणि गोळे येतात? मग नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, रात्रीच्या वेळी लागेल शांत झोप

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, दूषित पाण्याचे सेवन किंवा विकतचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवून संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. याशिवाय पावसाळ्यात आहारात होणाऱ्या बदलांमुळे फूड पॉयझनिंगचा धोका सुद्धा वाढू लागतो. त्यामुळे विकतचे अन्नपदार्थ अजिबात खाऊ नये. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात आहारात होणाऱ्या कोणत्या बदलांमुळे आरोग्य बिघडते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे बदल शरीरात दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात फूड पॉयझनिंग होण्याची कारणे:

सॅलड किंवा कापून ठेवलेल्या फळांचे सेवन:

संध्याकाळच्या वेळी किंवा इतर वेळी सामान्यपणे भूक लागल्यानंतर फळांचे सॅलड किंवा विकतची फळे आणून खाल्ली जातात. पण पावसाळ्यात कच्च्या भाज्यांचे सॅलड किंवा फळाचे सॅलड खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. ओल्या मातीमुळे पॅथोजेन्स जन्माला, जे पाण्यातून थेट शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे पावसाळ्यात भाज्या आणल्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच शिजवून खाव्यात. या दिवसांमध्ये कच्च्या भाज्या खाण्याऐवजी स्टीम, शिजलेल्या आणि उकडलेल्या भाज्या खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो.

स्ट्रीट फूड:

विकत मिळणारी सामोसा किंवा वडापावची चटणी सगळेच आवडीने खातात. पण चटणी तयार करताना काहीवेळा योग्य पाण्याचा वापर केला जात नाही. याशिवाय हिरवी चटणी बनवताना कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घेतला जात नाही. यामुळे पोटाला इन्फेक्शन होण्याची खूप जास्त शक्यता असते. चटणी कच्ची वाटल्यामुळे त्यातील जंतू नष्ट होत नाहीत आणि बॅक्टेरियाची वाढ झपाट्याने होऊन आरोग्य बिघडते.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जातात? वारंवार गाठी जाणे बेतू शकते जीवावर, ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी उपाय

पिण्याचे पाणी:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कायमच पाणी गरम करून प्यावे.पाण्यातील विषारी घटक पोटात प्रवेश करतात आणि त्यानंतर रक्तात मिक्स होतात. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणारे पाणी प्रत्येक वेळी सुरक्षित असेलच असे नाही. त्यामुळे कायमच उकळलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणी प्यावे. बाहेर कुठेही गेल्यानंतर पॅक बंद पाण्याची बाटली खरेदी करावी. पावसाळ्यात “शिजवा, उकळा, सोलून खा किंवा टाळा” असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पावसाळ्यात फूड पॉइझनिंगचा धोका का वाढतो?

    Ans: पावसाळ्यात आर्द्रता जास्त असल्यामुळे अन्नामध्ये जीवाणू, विषाणू आणि बुरशीची वाढ वेगाने होते. त्यामुळे दूषित अन्न खाल्ल्यास फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो.

  • Que: फूड पॉइझनिंगची सामान्य लक्षणे कोणती आहेत?

    Ans: मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप, अशक्तपणा आणि निर्जलीकरण ही फूड पॉइझनिंगची सामान्य लक्षणे आहेत.

  • Que: पावसाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळावे?

    Ans: उघड्यावर मिळणारे स्ट्रीट फूड, शिळे अन्न, नीट न धुतलेली फळे-भाज्या, कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस, मासे आणि दूषित पाणी टाळावे.

Web Title: Dietary changes during the monsoon can increase the risk of food poisoning otherwise illness may worsen leading to stomach disorders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • infections
  • monsoon care

संबंधित बातम्या

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या
1

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
2

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
3

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.