कॅल्शियम वाढवण्यासाठी या फळांचे करा सेवन
शरीरामध्ये कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे आहारात बदल करून शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता दूर करावी. हिवाळा ऋतू सुरु झाल्यानंतर शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. कारण वाढत्या थंडीमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरातील हाडांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली नाहीतर आरोग्य बिघडून जाते. थंडीमध्ये शरीरातील हाडांचे दुखणे वाढू लागते. त्यामुळे आहारात बदल करून कॅल्शियम आणि विटामिन डी युक्त पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
हिवाळ्यात बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची फळे उपलब्ध असतात. शिवाय हंगामी फळे मोठ्या प्रमाणवर मिळतात. रोजच्या आयुष्यात नियमित एक फळं खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. फळांमध्ये असलेला नैसर्गिक गोडवा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील कमी झालेली कॅल्शियम आणि विटामिन डी ची पातळी वाढवण्याची आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं संत्र खायला खूप आवडत. संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे आरोग्यासह त्वचेला अनेक फायदे होतात. शरीरात कमी झालेली कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी हिवाळ्यात नियमित एक संत्र खावे. थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाल्यामुळे त्वचेवर ग्लो शिवाय त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. चवीला आंबट गोड असलेले फळ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि प्रभावी आहे.
रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात डाळिंबाचे सेवन करावे. डाळिंब खाल्यामुळे शरीरात कमी झालेले रक्त वाढण्यास मदत होते. डाळिंब खाल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर बाहेर पडून जातात. शिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. सकाळच्या नाश्त्यात डाळिंबाचे सेवन केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो.
हिवाळ्यामध्ये बाजारात स्ट्रॉबेरी उपलब्ध असतात. चवीला आंबट गोड असलेली स्ट्रॉबेरी खाल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. शिवाय शरीरातील कॅल्शियम आणि विटामिन डी ची पातळी वाढते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त फळांचे सेवन करावे. विटामिन सी युक्त फळे बाजारात सहज उपलब्ध होतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून हाडांचे आरोग्य सुधारते.
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
पेरू खाल्यामुळे शरीरात कॅल्शियम आणि विटामिन ची पातळी वाढण्यास मदत होते. पेरू खाल्ल्यामुळे पोषक तत्वांची कमतरता भरून निघते आणि त्वचेला अनेक फायदे होतात. थंडीच्या दिवसांमध्ये नियमित पेरूचे सेवन केल्यास शरीर ताजेतवाने आणि फ्रेश राहते.