शरीर थंड ठेवण्यासाठी नियमित करा 'या' रसाचे सेवन
राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेचे वारे वाहू लागले आहेत. याशिवाय अचानक वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात सतत होणारे बदल आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता असते.उष्णता वाढल्यानंतर पोटात आग होणे, वारंवार घाम येणे, तळपायांमध्ये आग होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन करावे. आवळा हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आणि पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणधर्म शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य – iStock)
अणुबॉम्बचे शरीरावर होतात गंभीर परिणाम, तात्काळ आणि दीर्घकालीन दोन्हीचा खोलवर त्रास
उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये बाजारात आवळा हे फळ उपलब्ध असते. आवळ्याचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय यापासून जाम, लोणचे आणि कँडी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आवळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, अँटीऑक्सिडंट, पॉलीफेनॉल इत्यादी अनेक घटक आढळून येतात. दैनंदिन आहारात सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. आज आम्ही तुम्हाला शरीर स्वच्छ करण्यासाठी कशी पद्धतीने आवळ्याच्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा पुदिन्याच्या रसाचे सेवन करावे. पुदिना शरीरात थंडावा टिकवून ठेवण्याचे काम करतो. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन जाते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळा पुदिन्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होईल. याशिवाय यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी नियमित आवळ्याच्या रसाचे सेवन करावे.
आवळा पुदिन्याचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे बारीक तुकडे आणि पुदिन्याची पाने टाकून नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि जिऱ्याची पावडर टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एकदा बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेलं सरबत व्यवस्थित गाळून घ्या. त्यानंतर सेवन केल्यास त्वचा आणि शरीराला अनेक फायदे होतील.
विटामिन सी युक्त आवळ्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर सुधारण्यासाठी मदत करतात. आवळ्याची चटणी बनवताना सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे तुकडे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची घालून बारीक पेस्ट बनवून घ्या. नियमित या चटणीची सेवन केल्यास शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.