अणुबॉम्बचे मानवी आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद संपूर्ण जगभरात पसरले आहेत. या हल्ल्यात भारतातील अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तनमधील शांत झालेले युद्ध पुन्हा एकदा जागे होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना 7 मे रोजी ब्लॅक आउट आणि मॉक ड्रिल व सायरन वाजवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीसुद्धा भारत आणि पाकिस्तनमध्ये युद्ध झाले आहेत.(फोटो सौजन्य – iStock)
युद्धाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या अणुबॉम्बमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. कारण अणुबॉम्ब तयार करण्यात त्यात वापरली जाणारी हानिकारक रसायन, केमिकल इत्यादी विषारी घटक मानवी आरोग्यावर थेट परिणाम करतात. बॉम्ब हल्ला झाल्यानंतर केस गळणे, मळमळ, रक्तस्त्राव इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. अणुबॉम्बच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अणुबॉम्बचा हल्ला झाल्यानंतर तिथे जन्माला येणाऱ्या अनेक पिढयांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अणुबॉम्ब हल्ल्याचे मानवी आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. अणुबॉम्ब हल्ल्याचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
अणुबॉम्ब तयार करताना त्यात अनेक विषारी आणि आरोग्यासाठी घातक असलेल्या पदार्थांचा वापर केला जातो. याशिवाय अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर त्यातून किरणोत्सर्गी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे शरीराला हानी पोहचते. किरणोत्सर्गी पदार्थांमुळे शरीरातील पेशींचे नुकसान होते.
अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर ज्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकला जातो, तिथे असलेला संपूर्ण परिसर विषारी होण्याची शक्यता असते. याशिवाय यामधून उष्णता बाहेर पडते. या उष्णतेमुळे त्वचा भाजणे किंवा त्वचेवर गंभीर फोड येण्याची जास्त शक्यता असते. ही उष्णता त्वचेचे मोठे नुकसान करते.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर संपूर्ण शरीर कमकुवत होऊन जाते. अणुबॉम्बचा हल्ला झालेल्या ठिकाणी कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असतात. याशिवाय विषारी पदार्थांचा धोका सुद्धा वाढण्याची शक्यता असते. ल्युकेमियासारखे गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते.
अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर मानसिक आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. मानसिक त्रास, नैराश्य आणि इतर मानसिक आजार होऊन आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.