मासिक पाळीतील वेदना, क्राम्पसपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' लाल भाजीचे सेवन
प्रत्येक स्त्रीला महिन्यात पाच दिवस अतिशय नकोसे वाटत. कारण मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी आल्यानंतर कंबर दुखणे, पोटात वेदना होणे, ओटीपोटात वेदना होणे, मळमळ किंवा उलट्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्वच समस्यांना सामना महिलांना प्रत्येक महिन्यात करावा लागतो. मासिक पाळी आल्यानंतर शरीराची जास्त काळजी घ्यावी. कारण रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरात थकवा किंवा अशक्तपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. शरीरातील ऊर्जा कमी झाल्यानंतर वारंवार चक्कर येणे किंवा काम करण्याची इच्छा होत नाही. अशावेळी आहारात बीटचे सेवन करावे. महिलांच्या आरोग्यासाठी बीट खाणे वरदान मानले जाते.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेला थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचे आणि सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा थकवा, अशक्तपणा कमी होत नाही. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले लोह शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढतात. हार्मोन्सचे संतुलन राखणे, स्नायूंना आराम देणे, त्वचेवरील तेज कायम टिकवून ठेवण्यासाठी बीट खावे. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये बीट खाल्यामुळे महिलांच्या शरीराला नेमके कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना अतिशय असहाय वाटू लागतात. यामुळे पोटाच्या स्नायूंना सूज येण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी आहारात बीट खावे. बीटचा रस, भाजी किंवा सॅलड बनवून तुम्ही खाऊ शकता. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतात. शरीरात जमा झालेले अतिरिक्त पाणी बाहेर काढून टाकण्याचे काम बीट करते. त्यामुळे मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्याही गोळ्यांचे सेवन न करता घरगुती उपाय करून आराम मिळवावा.
शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर अशक्तपणा वाढू लागतो. अशावेळी आहारात कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी बीटचा रस नियमित प्यावा. बीटचा रस प्यायल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारते. बीटमध्ये लोह आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. या दोन्ही घटकांमुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढते.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित बीटच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल. आतड्यांमध्ये चिटकून राहिलेला विषारी मला स्वच्छ करण्यासाठी बीट आणि पुदिन्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीर स्वच्छ होते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी बीट खावे.
मासिक पाळी म्हणजे काय?
मासिक पाळी म्हणजे गर्भाशयाच्या अस्तरातून होणारा रक्तस्त्राव, जो मासिक पाळीच्या चक्राचा भाग असतो. गर्भधारणेसाठी शरीर गर्भाशयाचे अस्तर तयार करते. गर्भधारणा न झाल्यास, हे अस्तर रक्ताच्या रूपात योनीमार्गातून बाहेर टाकले जाते.
मासिक पाळी कधी उशिरा येते?
गर्भधारणा हे मासिक पाळी उशिरा येण्याचे एक प्रमुख कारण आहे. ताणतणाव, वजन बदलणे, किंवा काही वैद्यकीय स्थिती यामुळे देखील मासिक पाळी उशिरा येऊ शकते. जर पाळी अपेक्षित वेळेपासून एक आठवड्यापेक्षा जास्त काळ आली नाही, तर गर्भधारणा चाचणी करणे उचित आहे.
डॉक्टरांना कधी भेटावे?
जर ३ ते ६ महिने मासिक पाळी येत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अतिशय अनियमित, खूप कमी किंवा जास्त रक्तस्त्राव होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.