
मासिक पाळी कायमच उशिरा येते? शरीरात होणारे 'हे' बदल असू शकतात आरोग्यासाठी धोक्याची घंटा, वेळीच व्हा सावध
मासिक पाळीच्या चक्रात बदल का होतात?
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये हार्मोन्स का बदलतात?
मासिक पाळी उशिरा येण्याची कारणे?
सर्वच महिलांना महिन्यातील चार किंवा पाच दिवस मासिक पाळी येते. शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांमुळे मासिक पाळी येते. दर महिन्यालागर्भाशयाचे अस्तर आणि रक्त योनीमार्गे बाहेर पडून जाते. या दिवसांमध्ये महिला शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड देत असतात. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. मासिक पाळी आल्यानंतर कंबर दुखणे, पोटात वेदना होणे, उलट्या, मळमळ इत्यादी बरीच लक्षणे दिसू लागतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात, पण हेच बदल कालांतराने वाढतात आणि शरीरासाठी धोक्याचे ठरतात.(फोटो सौजन्य – istock)
टॉयलेटमध्ये वापरताय स्मार्ट फोन! Smart बना आणि ‘हे’ करा, वेळीच बदल सवय
महिलांच्या शरीरातील संप्रेरकांचे बिघडल्यानंतर सगळ्यात पहिला परिणाम मासिक पाळीवर दिसून येतो. ज्याला वैद्यकीय भाषेत ओलिगोमेनोरिया असे म्हणतात. हे बदल झाल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रात बदल होतात, ज्यामुळे काहीवेळा मासिक पाळी उशिरा येते तर काहीवेळा मासिक पाळी महिन्यातून दोनदा येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करता वेळीच उपचार करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
सतत काम, मानसिक तणाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या शरीरावर लगेच दिसून येतो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोनची वाढ झाल्यानंतर मेंदूतील ‘हायपोथालेमस’वर परिणाम होतो, ज्यामुळे मासिक पाळी खूप जास्त लेट येते. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. मानसिक तणावाचा परिणाम मासिक पाळीच्या चक्रावर लगेच दिसून येतो.
हल्ली अनेक महिला आणि मुलींमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमची समस्या दिसून येत आहे. यामध्ये अंडाशयात लहान लहान गाठी तयार होतात, ज्याच्या परिणामामुळे मासिक पाळी कधी लवकर तर उशिरा येण्याची शक्यता असते. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्या मासिक पाळीचे चक्र बिघडून जाते. याशिवाय वजन वाढल्यानंतर शरीरात अनावश्यक चरबीचा थर जमा होण्यास सुरुवात होते. शरीरातील चरबीचे प्रमाण बिघडल्याने ‘इस्ट्रोजेन’ हार्मोन्सवर घातक परिणाम दिसून येतात.
थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय क्रिया आणि हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. हायपरथायरॉईडिझम किंवा हायपोथायरॉईडिझम मुळे मासिक पाळीच्या तारखांमध्ये बदल होतात. याशिवाय मासिक पाळी आल्यानंतर महिलांना खूप जास्त त्रास होतो. जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम मासिक पाळीच्या चक्रावर लगेच दिसून येतो. अपुऱ्या झोपेमुळे शरीराचे ‘बायोलॉजिकल क्लॉक’ बिघडते आणि मासिक पाळी अनियमित होते. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी पूर्णपणे कमी होऊन जाते.
Ans: ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जिथे गर्भधारणा न झाल्यास गर्भाशयाचे अस्तर योनीमार्गातून रक्तस्त्राव म्हणून बाहेर पडते.
Ans: सामान्यतः ३ ते ७ दिवस. पण प्रत्येक स्त्रीनुसार यात बदल असू शकतो.
Ans: साधारण १२ ते १५ वर्षे वयात किंवा कधीकधी त्याआधीही.