आतड्यांमध्ये कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराला सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन करावे. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे जेवणाच्या वेळा बदलून जातात. ज्यामुळे कोणत्याही वेळी तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात कायमच जंक फूड आणि तिखट तेलकट पदार्थांचे सेवन शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे अपचन किंवा गॅस होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या उद्भवल्यानंतर गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून आराम मिळवावा.(फोटो सौजन्य – istock)
खराब गट हेल्थमुळे येऊ शकतो Heart Attack, ‘या’ लक्षणांनी ओळखा बिघडलेल्या पचनचा धोका
सतत अपचनाची समस्या वाढू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. बद्धकोष्ठता वाढल्यानंतर योग्य वेळी औषध उपचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गाजर खायला खूप जास्त आवडते. आतड्यांमधील हालचाल वेगवान करण्यासाठी आहारात नियमित गाजर खावे. पचनाची समस्या, पोटात वाढलेला जडपणा आणि पोट फुगणे इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गाजर खावे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात सॅलडमध्ये गाजराचा आवश्यक समावेश करावा. गाजर खाल्यामुळे आतड्यांमधील विषारी घटक बाहेर पडून जातात.
पोटाचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात नियमित पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. पपई खाल्यामुळे पोट स्वच्छ होते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पपई खावा. कच्ची पपई आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात. कच्च्या पपईपासून बनवलेला पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो.
गर्भवती महिलांमध्ये वाढतोय संसर्गाचा धोका, आहार-स्वच्छतेच्या काळजीचा तज्ज्ञांचा सल्ला
आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाण्यासाठी नियमित एक चमचा तूप खावे. तूप खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचलेली घाण बाहेर पडून जाते. तूप खाल्यामुळे आतड्यांमधील नैसर्गिक लुब्रिकेशन वाढते. तूप खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, आतड्यांमधील त्रास कमी होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
बद्धकोष्ठता म्हणजे आतड्याची हालचाल अनियमित होणे, जसे की आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास जाणे.यात मल कठीण आणि घट्ट असतो, ज्यामुळे शौचास त्रास होतो आणि खूप जोर द्यावा लागतो.
बद्धकोष्ठतेची प्रमुख कारणे?
फायबरयुक्त अन्नपदार्थ (फळे, भाज्या, धान्ये) कमी खाल्ल्याने मल कठीण होतो. पुरेसे पाणी प्यायल्याने फायबर व्यवस्थित काम करते; पाणी कमी प्यायल्यास मल कठीण होतो. बैठे काम किंवा कमी शारीरिक हालचाल केल्याने पचनाची प्रक्रिया मंदावते आणि बद्धकोष्ठता वाढते.
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी उपाय:
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि डाळींचा आहारात समावेश करा. चालणे, धावणे यांसारख्या शारीरिक हालचालींमुळे आतड्यांची कार्यक्षमता वाढते. दररोज पुरेसे पाणी आणि इतर द्रव पदार्थ प्या.