फोटो सौजन्य: Freepik
हल्ली रोगराईच्या वातावरणात आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी ठेवणे फार महत्वाचे आहे. यासाठीच आपल्या शरीराला गरज असते ती मुबलक व्हिटॅमिन्सची. एका नव्या संशोधनातून असे समोर आले आहे की, व्हिटॅमिन बी12, फॉलिक ॲसिड आणि कोलीन हे मेंदू तसेच शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. ही जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात खाल्ल्याने आपला मेंदू वाढत्या वयातही निरोगी राहतो. त्यामुळे या पोषक घटकांचा आहारात समावेश केला पाहिजे.
व्हिटॅमिन B12 चे महत्त्व
व्हिटॅमिन बी 12 आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. हे व्हिटॅमिन आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास, रक्त पेशी तयार करण्यास आणि नर्व्हस सिस्टिम योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. व्हिटॅमिन बी 12 मेंदूच्या पेशी निरोगी ठेवण्यात आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे वाढत्या वयाबरोबर मानसिक कमजोरी आणि स्मरणशक्तीची समस्या उद्भवू शकते.
फॉलिक ऍसिडची भूमिका (Vitamin B9 )
फॉलिक ऍसिड, ज्याला व्हिटॅमिन B9 देखील म्हणतात. हा व्हिटॅमिन मेंदूमधील पेशींच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. हे स्मरणशक्ती वाढवते आणि मानसिक आरोग्य सुधारते. तसेच मानसिक ताण आणि नैराश्य कमी करण्यास देखील मदत करते.
कोलीनची गरज
कोलीन हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे शरीर व मेंदूचे योग्य कार्य करण्यास मदत करते. हे मेंदूच्या नर्व्हस सिस्टिममधील संदेश पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची प्रक्रिया मजबूत करते. कोलीनमूळे आपली विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढवते.
या पदार्थांचा करा आहारात समावेश
व्हिटॅमिन बी 12: अंडी, मासे, दूध आणि चिकनमध्ये हे व्हिटॅमिन आढळते. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
फॉलिक ऍसिड: हिरव्या पालेभाज्या, फळे आणि नट्समध्ये हे व्हिटॅमिन आढळतात.
कोलीन: अंड्यातील पिवळं बलक, मासे आणि नट्समध्ये हे व्हिटॅमिन आढळतात.