Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आहारात लपलाय सौंदर्याचा खजिना! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, कायमच दिसाल तरुण

चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळांचे, नट्स, दही, ताक, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे त्वचा कायमच हायड्रेट आणि चमकदार राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 09:47 AM
आहारात लपलंय सौंदर्याचा खजिना! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ, कायमच दिसाल तरुण

आहारात लपलंय सौंदर्याचा खजिना! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ, कायमच दिसाल तरुण

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक महिला आणि पुरुषांना आपली त्वचा कायमच सुंदर आणि चमकदार हवी असते. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी महागडे फेसवॉश वापरले जातात तर कधी महागड्या सनस्क्रीन लावून त्वचेची काळजी घेतली जाते. वारंवार केलेल्या केमिकल युक्त ट्रीटमेंट त्वचेसाठी अतिशय हानिकारक ठरतात. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी महिला हजारो रुपये विविध स्किन केअर प्रॉडक्टसाठी खर्च करतात. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा चांगली होण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते. सुंदर दिसण्यासाठी त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे खूप जास्त गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ

सुंदर दिसण्यासाठी त्वचेमध्ये योग्य प्रमाणात कोलेजन वाढवणे आवश्यक आहे. कोलेजन वाढवण्यासाठी आहारात लिंबू आणि आंबट फळांचे सेवन करावे. शरीरात कोलेजनची पातळी संतुलित राहिल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा बारीक रेषा अजिबात येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन आहारात संत्री, मोसंबी, पपई यांसारख्या फायबर असलेल्या फळांचे भरपूर आवर्जून सेवन करावे. यामुळे चेहऱ्यावर काळे डाग अजिबात येत नाहीत.

सुका किंवा नट्स खाल्ल्यामुळे त्वचेला भरपूर पोषण मिळते. या पदार्थांमध्ये ओमेगा- ३ फॅटी ॲसिड्स युक्त घटक असतात. त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी नट्स आणि बियांचे सेवन करावे. कोरड्या त्वचेची समस्या असलेल्या व्यक्तींनी आहारात अक्रोड आणि जवस हे पदार्थ खावेत. यामुळे त्वचेमध्ये ओलावा कायम टिकून राहतो.

दुपार आणि संध्याकाळच्या जेवणात नियमित गाजर, बीट आणि पपई इत्यादी बीटा-कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा अतिशय सुंदर दिसते. बीट खाल्ल्यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. त्यामुळे नियमित बीटचा रस किंवा कच्चे बीट, गाजर खावे. चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पपई खावी.

त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पोट स्वच्छ असणे फार महत्वाचे आहे. पचनक्रिया चांगली राहण्यासाठी नियमित एक ग्लास ताक प्यावे. दह्यातील लॅक्टिक ऍसिड त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. तसेच ताक प्यायल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. त्वचा कायमच हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि त्वचा चमकदार राहते.

ओठांजवळील निस्तेज झालेली त्वचा पुन्हा एकदा सुंदर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील फायदेशीर, टॅन होईल कमी

त्वचा कायमच तरुण ठेवण्यासाठी साखर आणि तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. महिनाभर आहारातून साखर काढून टाकल्यास त्वचा ग्लोइंग आणि चमकदार दिसेल. याशिवाय सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी किंवा जास्वदींच्या फुलांचा चहा प्यावा. फुलांचा चहा प्यायल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: The treasure of beauty hidden in food eat these foods regularly to increase the glow on your face you will look young forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Healthy Foods
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कायमच्या दूर! स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणाऱ्या मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
1

चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कायमच्या दूर! स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणाऱ्या मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

नॅचरल ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा घरीच तयार केलेले होममेड राइस जेल, तांदळाच्या वापरामुळे त्वचा राहील तरुण
2

नॅचरल ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा घरीच तयार केलेले होममेड राइस जेल, तांदळाच्या वापरामुळे त्वचा राहील तरुण

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब
3

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट
4

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.