आठवड्यातून एकदा 'या' फळांचे सेवन केल्यास कधीच वाढणार नाही अॅसिडिटी
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आहारात सतत काहींना काही बदल होत असतात. घाईगडबडीच्या दिवशी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. ज्यामुळे अॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. नियमित तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त वाढू लागते. शरीरात पित्ताचे प्रमाण वाढल्यानंतर अॅसिडिटी होणे, आंबट ढेकर येणे, सतत मळमळ किंवा उलटी झाल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक समस्या शरीरात दिसून येतात. त्यामुळे आहारात कायमच कमी तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करावे. अपुऱ्या झोपेचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे गॅस होणे, पोट फुगणे, अॅसिडिटी, थकवा इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा अॅसिडिटी वाढल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधाचे सेवन करतात. पण वारंवार गोळ्या औषधाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. सतत औषध खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली अॅसिडिटी कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे शरीर कायमच निरोगी राहते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते. शरीरात वाढलेली अॅसिडिटी कमी करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात नियमित पपईचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली अॅसिडिटी नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय पपईमध्ये असलेले पापेन नावाचे विशेष एन्झाइम शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे आहारात तुम्ही पपईचे सेवन करू शकता. मांस, अंडी, मसूर किंवा चीज इत्यादी पचनासाठी जड असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात अॅसिडिटीचे प्रमाण वाढू लागते. अशावेळीपपई खाणे फायद्याचे ठरते. पोटात वाढ्लेली जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी पपई खावी.
किमतीने महाग असलेले किवी हे फळ चवीला आंबट गोड लागते. पण आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. किवीमध्ये विटामिन सी आणि अॅक्टिनिडिन नावाच्या एन्झाइम असते. त्यामुळे जड अन्नपदार्थांचे सेवन केल्यास किवी खावी. यामुळे तुमची पचनक्रिया कायमच निरोगी राहील. पोट फुगणे, गॅस इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी किवी खावी.
Teeth Whitening: पिवळे दात सफेद करण्याचे घरगुती उपाय, 2 मिनिटात होईल Plaque टार्टरची स्वच्छता
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अननस खायला खूप जास्त आवडतो. अननस चवीला अतिशय आंबट असतो. यामध्ये ब्रोमेलेन नावाचे नैसर्गिक एन्झाइम आढळून येते. ज्यामुळे शरीरातील प्रथिनांचे विघटन होऊन पचनक्रिया सुधारते. अननस खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. पण अननसाचे नियमित सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते.
ऍसिडिटी म्हणजे काय?
ऍसिडिटी म्हणजे शरीरात ऍसिडचे प्रमाण वाढणे. ऍसिड हे अन्न पचनासाठी आवश्यक असते, परंतु त्याचे प्रमाण वाढल्यास छातीत जळजळ, पोटदुखी, आंबट उलट्या, इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
ऍसिडिटी होण्याची कारणे काय आहेत?
वेळेवर न जेवल्यास किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास ऍसिडिटी होऊ शकते. जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिटी वाढू शकते. ताण-तणावामुळे देखील ऍसिडिटी होऊ शकते.
ऍसिडिटीची लक्षणे काय आहेत?
छातीत जळजळणे हे ऍसिडिटीचे प्रमुख लक्षण आहे.पोटात दुखणे किंवा वेदना होणे.आंबट चवीच्या उलट्या होणे.