विटामिन सी युक्त आंबटगोड बोरांचे हिवाळ्यात करा सेवन! जाणून घ्या नियमित किती प्रमाणात बोरं खावी
बोरांमध्ये विटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. बदलत्या वातावरणात शरीराची काळजी घेण्यासाठी बोरांचे सेवन करावे.
सर्दी, ताप आणि खोकल्यापासून बचाव करण्यासाठी बोरं खावीत. यामुळे शरीराचे रक्षण होते आणि गंभीर आजारांची शरीराला लागण होत नाही. पचनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी बोरं वरदान ठरतात.
बोरांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे हाडांची झीज होत नाही. मजबूत हाडांसाठी बोरांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो.
बोरांमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण सुद्धा बोर खाऊ शकतात. पण अतिप्रमाणात बोरांचे सेवन केल्यास पोटाचे विकार होण्याची जास्त शक्यता असते.
बाजारातून विकत आणलेली बोर कायमच स्वच्छ धुवून खावीत. कारण बोरांवर असलेली धूळ, माती स्वच्छ होऊन जाते.