Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार उद्भवणाऱ्या गॅस ॲसिडिटीकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! उद्भवू शकतात गंभीर आजार, ‘हे’ उपाय केल्यास मिळेल आराम

पचनक्रिया कायमच मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीत छोटे मोठे बदल करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात सकारात्मक परिणाम दिसून येतात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 29, 2026 | 03:40 PM
वारंवार उद्भवणाऱ्या गॅस ॲसिडिटीकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! उद्भवू शकतात गंभीर आजार

वारंवार उद्भवणाऱ्या गॅस ॲसिडिटीकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! उद्भवू शकतात गंभीर आजार

Follow Us
Close
Follow Us:

अपचन होण्याची कारणे?
ॲसिडिटी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
ॲसिडिटी होऊ नये म्हणून जीवनशैलीत कोणते बदल करावेत?

हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला गॅस, अपचनाची समस्या उद्भवत आहे. पण बऱ्याचदा ॲसिडिटी किंवा गॅसची समस्या अतिशय सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजार होऊ शकतात. उपाशी पोटी चहा पिणे, रात्री कोणत्याही वेळी जेवणे, अपचन, पाण्याची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, जागरण इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे काहींना सतत ॲसिडिटी, गॅस आणि अपचन होते. ॲसिडिटी झाल्यानंतर डोकेदुखी, मानेच्या नसांमध्ये वेदना, उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यामुळे पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव येतो. खाल्लेले अन्नपदार्थ पचन करण्यासाठी जास्त वेळ लागतो. अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अन्नाचे बारीक कण अन्ननलिकेमध्ये अडकून राहतात, ज्यामुळे ॲसिडिटी वाढते.(फोटो सौजन्य – istock)

मासिक पाळी कायमच उशिरा येते? शरीरात होणारे ‘हे’ बदल असू शकतात आरोग्यासाठी धोक्याची घंटा, वेळीच व्हा सावध

पोट फुगणे हे पित्ताशयात झालेल्या खड्यांचे गंभीर लक्षण असू शकते. याशिवाय काहीवेळा पोटाच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष केल्यामुळे हर्निया किंवा पोटाच्या कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात. शरीराला गंभीर आजारांपासून कायमच दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे ७० टक्के आजार बरे होतात आणि शरीराला गंभीर आजारांची लागण अजिबात होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ॲसिडिटी होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? ॲसिडिटी होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

गॅस आणि ॲसिडिटीची मुख्य कारणे:

कोणत्याही वेळी जेवणे, रात्री कधीपण खाणे, पाणी कमी पिणे, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींमुळे ॲसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. वारंवार ॲसिडिटी किंवा अपचन होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत. कारण पोटात वाढलेल्या अल्सरमुळे सतत पोटासंबंधित समस्या उद्भवू लागतात. कमी पाण्याचे सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यामुळे पचनसंस्थेवर जास्तीचा तणाव निर्माण होतो आणि आरोग्य बिघडते.

गंभीर लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष:

  • अन्नपदार्थ गिळताना त्रास होणे.
  • उलटीमधून रक्त पडणे
  • मळमळ सतत उलट्या होणे
  • विनाकारण वजन कमी होणे
  • रात्री झोपेत खोकला येऊन गुदमरल्यासारखे वाटणे, ही लक्षणे पोटात जखमा किंवा अल्सर झाल्यानंतर दिसून येतात.
Cervical Cancer: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि लैंगिक आरोग्य, गैरसमज टाळा; आरोग्याचा मार्ग निवडा!

जीवनशैलीत करा हे छोटे पण महत्वपूर्ण बदल:

वारंवार होणाऱ्या ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. नियमित भरपूर पाण्याचे सेवन, ताजे अन्नपदार्थ, फळे, सुका मेवा इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच नियमित १० किंवा ३० मिनिटांपर्यंत शारीरिक हालचाली केल्यास कायमच निरोगी राहाल. पचनाच्या कोणत्याही समस्या कधीच उद्भवणार नाहीत. जेवणताना घाई न करता प्रत्येक घास ३२ वेळा चावून खावा. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होतात. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आतडे निरोगी आहेत हे कसे ओळखावे?

    Ans: दररोज नियमित शौचास होणे, पोट साफ होणे, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या नसणे आणि चांगली ऊर्जा पातळी असणे ही निरोगी आतड्यांची लक्षणे आहेत।

  • Que: आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?

    Ans: फायबरयुक्त पदार्थ (फळे, भाज्या, धान्य), कडधान्ये आणि प्रोबायोटिक पदार्थ (दही, ताक, आंबवलेले पदार्थ) खावेत. यामुळे शरीरात फायदेशीर बॅक्टेरियांची संख्या वाढते.

  • Que: आतड्यांच्या आरोग्याचा मानसिक आरोग्याशी काय संबंध?

    Ans: होय, आतड्याला 'दुसरा मेंदू' म्हटले जाते, कारण मेंदू आणि आतड्यांचा थेट संबंध असतो. खराब आतड्यांमुळे ताणतणाव आणि चिंता वाढू शकते।

Web Title: Do not ignore frequent gas acidity serious diseases may occur this remedy will provide relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • acidity
  • gut health
  • home remedies
  • Improves digestion

संबंधित बातम्या

महागड्या क्रीम लावण्याऐवजी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा त्वचेसाठी वापर, चेहऱ्यावर येईल तेजस्वी ग्लो
1

महागड्या क्रीम लावण्याऐवजी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा त्वचेसाठी वापर, चेहऱ्यावर येईल तेजस्वी ग्लो

चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन होईल कायमचे गायब! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस क्रीम
2

चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन होईल कायमचे गायब! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस क्रीम

आंबवलेला भात खाल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या भात बनवण्याची कृती आणि शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे
3

आंबवलेला भात खाल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या भात बनवण्याची कृती आणि शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे

कमकुवत झालेल्या केसांना पोषण देण्यासाठी खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, वयाच्या ५० व्या वर्षी होतील केस घनदाट
4

कमकुवत झालेल्या केसांना पोषण देण्यासाठी खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, वयाच्या ५० व्या वर्षी होतील केस घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.